मुंबईत लसीकरणाला सुरुवात, मुख्यमंत्र्यांनी केलंय 'हे' आवाहन

 राज्यातील 285 केंद्राद्वारे लसीकरण मोहिम राबवली जाणार 

Updated: Jan 16, 2021, 12:09 PM IST
मुंबईत लसीकरणाला सुरुवात, मुख्यमंत्र्यांनी केलंय 'हे' आवाहन title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्याहस्ते मुंबईत कोरोना लसीकरण मोहिमेचे उद्घाटन झाले. लसीकरणास सुरुवात झाली असली तरी संकट अजूनही टळलेलं नाहीय असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. लसीकरणानंतरही मास्क घालणं, सओशल डिस्टन्सिंगचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. राज्यातील 285 केंद्राद्वारे लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे. 

लस घेतल्यानंतर काळजी घेतली पाहीजे असे ते यावेळी म्हणाले. तसेच कोरोना योद्ध्यांचे यावेळी त्यांनी आभार मानले.

कूपर रुग्णालयात पहिली लस शिवसेनेचे माजी मंत्री दीपक सावंत आणि त्यांची पत्नी अंजली सावंत लस घेणार आहेत. कोणीही घाबरण्याचे कारण नसून यात कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाहीत असे ते म्हणाले.