लोकलमधून आता दिव्यांग आणि कॅन्सर रुग्णांना प्रवास करण्याची मुभा

लोकलमधून आता दिव्यांग आणि कॅन्सर रुग्णांना प्रवास करण्याची मुभा

Updated: Oct 8, 2020, 09:56 PM IST
लोकलमधून आता दिव्यांग आणि कॅन्सर रुग्णांना प्रवास करण्याची मुभा title=

मुंबई : लोकलमधून आता दिव्यांग आणि कॅन्सर रुग्णांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेने दिव्यांग आणि कॅन्सर रुग्णांना प्रवास करता येणार आहे. कॅन्सर पीडितांना फार मोठ्या मनस्तपला सामोरं जावं लागतं होतं. त्यानंतर सरकारने त्यांना मोठा दिलासा दिला आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक महिने रेल्वे सेवा बंद होती. लॉकडाऊननंतर अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी रेल्वे सुरु करण्यात आली. पण सर्वसामान्य लोकांना अजूनही रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. हळूहळू सरकार प्रवासाची मुभा देत आहे. लोकल बंद असल्याने रस्ते वाहतूकीवर मोठा ताण पडत आहे. मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याने 1 तास ऐवजी 3 ते 4 तास लागत आहेत.

या काळात दिव्यांग आणि कर्करोगाशी ग्रस्त असलेल्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. दिव्यांग नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी मुंबई गाठावी लागते. बसमध्ये गर्दी आणि रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडीने प्रवास असह्य होत होता. यामुळे दिव्यांग प्रवाशांना वैद्यकीय उपचारासाठी लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्याची मागणी प्रवासी संघटनेने सरकारकडे केली होती.