१० टक्के आरक्षण : 'MPSC परीक्षेसाठी राज्य सरकारची सूचना नाही'

राज्य लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या आगामी परीक्षांसाठी आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने अजूनही सूचना दिल्या नसल्याचे उघड.

Updated: Jan 18, 2019, 08:03 PM IST
१० टक्के आरक्षण : 'MPSC  परीक्षेसाठी राज्य सरकारची सूचना नाही' title=

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या आगामी परीक्षांसाठी आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने अजूनही सूचना दिल्या नसल्याचे उघड झाले आहे. लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष चंद्रशेखर ओक यांनी ही माहिती दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून यासंदर्भात अजून परिपत्रक आलेले नसल्याची माहितीही ओक यांनी दिली. १७ फेब्रुवारील आणि २४ मार्चला विविध पदांसाठी एमपीएससीची पूर्व परीक्षा होत आहेत. त्यामुळे सवर्ण आरक्षण लागू करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तसेच आगामी काळात हे आरक्षण लागू झाल्यास पदसंख्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. 

ठळक बाबी :

- एमपीएससी आगामी परीक्षांसाठी 10 टक्के सवर्ण आर्थिक दुर्बल आरक्षण लागू करण्याबाबत अद्याप सरकारकडून सूचना नाही.
- लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष चंद्रशेखर ओक यांची माहिती
- सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक प्राप्त होण्याची प्रतिक्षा
- 17 फेब्रुवारी आणि 24 मार्च रोजी एमपीेएससी पूर्व परीक्षा
- आरक्षण लागू होण्याबाबत विद्यार्थांमध्ये संभ्रम,लागू झाल्यास पदसंख्यांमध्ये बदल होणार