येस बँक संस्थापकांविरोधात लुकआऊट नोटीस, देश सोडण्यास मनाई

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.  

Updated: Mar 7, 2020, 08:23 AM IST
येस बँक संस्थापकांविरोधात लुकआऊट नोटीस, देश सोडण्यास मनाई title=

मुंबई : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर (YES Bank founder Rana Kapoor) यांच्या मुंबईतल्या घरी ईडीने ( ED ) छापेमारी केलीय. काल रात्रीच्या सुमारास ईडीन छापा टाकला. दरम्यान मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, कर्जवाटप संदर्भात सर्व कागदपत्रे ईडीकडून तपासण्यात येत आहेत. राणा कपूर विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना देश सोडता येणार नाही. ईडीने कपूरच्या समुद्र महल या वरळीतल्या घरावर छापा टाकला. 

कपूर यांची यावेळी कसून चौकशी करण्यात आली. डीएचएफएलला बँकेने केलेल्या कर्जपुरवठ्याचा परतावा झालेला नाही. त्या संदर्भात राणा कपूरवर केस आहे. ईडीने या छाप्यात काही पुरावे गोळा केले. बँकेने केलेल्या या कर्ज वाटपात कपूरचा नेमका सहभाग काय होता याचा तपास केला जातोय. या कर्जपुरवठ्यानंतर कपूरच्या बायकोच्या खात्यात जमा झालेल्या मोठ्या रक्कमांची चौकशीही सुरू आहे. 

राणा कपूर यांच्या घरावर ईडीचा छापा

दमऱ्याम, राणा कपूर यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. येस बँकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यानंतर आरबीआयने बँकेवर निर्बंध आणले आहेत. पुढच्या महिन्याभरात येस बँकेच्या ग्राहकांना जास्तीत जास्त ५० हजार रुपये बँकेतून काढता येणार आहेत. याचसोबत आरबीआयने येस बँकेचं संचालक मंडळही बरखास्त केले आहे. 

येस बँकेत एसबीआयने २ हजार ४५० कोटी रुपये गुंतवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता येस बँकेची ४९ टक्के मालकी एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाकडे जाणार आहे. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर सीईओ आणि तीन संचालक नेमले आहेत.