ईडीची मोठी कारवाई, अनिल देशमुखांची 4.20कोटींची मालमत्ता जप्त

ईडीने अनिल देशमुखांवर मोठी कारवाई केली आहे.  

Updated: Jul 16, 2021, 05:17 PM IST
ईडीची मोठी कारवाई, अनिल देशमुखांची 4.20कोटींची मालमत्ता जप्त title=

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) ईडीकडून (Enforcement Directorate) मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने देशमुख कुटुंबियांची एकूण 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने देशमुख कुटुंबियांची मुंबई आणि उरणमधील मालमत्ता जप्त केली आहे.(ED has seized assets worth Rs 4 crore 20 lakh from former Maharashtra Home Minister Anil Deshmukh) 

जप्त केलेल्या मालमत्तेत वरळीतील फ्लॅटचा समावेश आहे. या फ्लॅटची किंमत ही 1 कोटी  54 लाख इतकी आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील 2 कोटी 67 लाखांची जमीनही जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

अनिल देशमुखांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स देण्यात आले होते. पण देशमुख यांनी तब्येतीचं कारण देच उपस्थित राहिले नव्हते. मात्र यांनंतर ईडीने देशमुख यांच्या 2 सचिवांना अटक केली होती. या चौकशीच्या माध्यमातून ईडीला माहिती मिळाली. त्या माहितीच्या जोरावर इडीने ही जप्तीची कारवाई केली आहे.   

ईडीचा वापर राजकीय आकसाने 

देशमुखांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी यावर आपली प्रतिक्रिया दिलीय.  ईडीचा वापर हा राजकीय आकसाने होतोय, काँग्रेसचं सुरुवातीपासून हे मत आहे, असं थोरातंनी स्पष्ट केलंय.