शिवसेनेच्या अडचणीत वाढ! संजय राऊत यांना ED चे समन्स; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना शिवसेना नेते संजय राऊतांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) समन्स पाठवले आहे.

Updated: Jun 27, 2022, 12:53 PM IST
शिवसेनेच्या अडचणीत वाढ! संजय राऊत यांना ED चे समन्स; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश title=

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना शिवसेना नेते संजय राऊतांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) समन्स पाठवले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास सरकार कोसळण्याची शक्यता आहे. 38 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींदरम्यान महाविकास आघाडीच्या निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना आता सक्तवसुली संचालनालयाने समन्स पाठवले आहे. उद्या (28 जून)रोजी त्यांची चौकशी होणार आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले असून, ते म्हटले की, 'अद्याप नोटीस आली नाही, पण येण्याची शक्यता आहे. जरी नोटीस आली तरी मी उद्या ईडीसमोर चौकशीला जाणार नाही. पुढची वेळ मागून घेईन. कारण माझी उद्या अलिबागमध्ये नियोजीत सभा आहे.'