राज्यात 'शिंदे' सरकार! मुख्यमंत्र्यांना आम्ही वारंवार सांगितलं, पण... एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण

50 आमदारांच्या विश्वासाल तडा जाऊ देणार नाही - एकनाथ शिंदे

Updated: Jun 30, 2022, 05:53 PM IST
राज्यात 'शिंदे' सरकार! मुख्यमंत्र्यांना आम्ही वारंवार सांगितलं, पण... एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण title=

Eknath Shinde Government : राज्यात गेले आठ दिवस सुरु असलेल्या सत्तासंघर्षात नाट्यमय वळण आलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक मारत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. 

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी राज्यपालांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर राजभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केली. तर फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवत बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं म्हणत एकनाथ शिंदेंनी फडणवीसांचे आभार मानले 

तसंच एकनाथ शिंदे यानी आपल्यासोबत असलेल्या सर्व 50 आमदारांचे आभार मानले तसंच त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचं म्हटलंय. 

माझ्याबरोबर शिवसेनेचे 39 आणि इतर 11 असे 50 आमदार आहेत. त्यात काही मंत्री आहे, या सर्व 50 आमदारांनी लढाई लढलेली आहे.  
बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांची भूमीका आणि जे आमदार आहेत त्यांच्या मतदार संघातील विकास कामं आणि राज्याचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत. सहयोगी आणि अपक्ष आमदार असे जवळपास 50 आमदार गेले काही दिवस एकत्र आहोत. 

ज्या 50 लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो कदापि तोडणार नाही. जो यापूर्वी त्यांना अनुभव आला तोही त्यांना येऊ देणार नाही असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

जे काही अडीच वर्षापूर्वी घडलं, मुख्यमंत्र्यांना आपल्या मतदार संघातील समस्या असतील, विकास प्रकल्प असतील, अडचणी असतील, याबाबत वारंवार माहिती दिली. मी देखील अनेकवेळा त्यांच्याबरोबर चर्चा केली. इतक्या मोठ्या प्रमाणावर 50 लोक एकत्र येतात, मी नगरविकास मंत्री होतो, मला अडचणी होत्या त्या बाजूला राहू दया, पण जे बाकीचे आमदार आहेत, त्यांच्या मतदार  संघातील समस्या त्यांनी मला सांगितल्या, महाविकास आघाडीत निर्णय घेता येत नव्हते, त्यानंतर आपण हा निर्णय घेतल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.