Exclusive : एल्फिन्स्टनच्या 'लष्करी पूला'वरुन...

 लष्करी जवानांनी आज माध्यमांच्या समोर ब्रीजचा गर्डर एकमेकांशी जोडला.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Jan 27, 2018, 05:46 PM IST
Exclusive : एल्फिन्स्टनच्या 'लष्करी पूला'वरुन... title=
मुंबई :  २९ सप्टेंबरला झालेल्या एल्फिन्स्टन दुर्घटनेमध्ये २२ जणांचा मृत्यू तर २५ जण जखमी झाले. यानंतर पर्यायी ब्रीज बांधण्याच्या दृष्टीने आक्रमक पाऊले उचलण्यात आली. लष्करी जवानांनी आज माध्यमांच्या समोर ब्रीजचा गर्डर एकमेकांशी जोडला.

तात्काळ पाऊलं 

दुर्घटनेनंतर केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या पुलच्या आराखड्याविषयी माहिती घेतली. ३१ जानेवारी २०१८ पर्यंत लष्करातर्फे पादचारी पूल बांधण्यात येणार असल्याचे सांगितले.

लष्करी शिस्तीचं प्रदर्शन 

२४० फूट लांब असलेल्या पादचारी पूलाचे काम ३१ ऑक्टोबरला सुरू झाले. १०० फूट, ४० फूट आणि १०० फूट अशा तीन गर्डरने हा ब्रीज पूर्ण होणार आहे.
त्यातील १०० फूट गर्डर काल शुक्रवारी मध्यरात्री टाकण्यात आला. त्याला ४० फूटाचा गर्डर जोडण्यात आला.
 
पुढील १०० फूट गर्डर जोडण्याचे कामही आजच्या दिवसात पूर्ण होणार आहे. लष्करी शिस्तीचं अनोखं दरम्यान या निमित्तानं बघयाला मिळालं. प्लानिंग, डिझायनिंग, एक्सिक्यूशनसाठी आम्हाला नोव्हेंबर महिना लागल्याचे ब्रिगेडियर धीरज मोहन यांनी यावेळी सांगितले. 

आंबिवलीचा पुल ९ मिनिटांत 

आंबिवलीच्या पुलाचं काम सकाळी लष्करी अधिकाऱ्यांनी सुरू केलं.दोन्ही बाजूचे खांब आधीच बांधून झाले होते.
 
फक्त गर्डर टाकण्याचं काम बाकी होतं. लष्करी अधिकाऱ्यांनी हे काम आपल्या कौशल्याच्या जोरावर अवघ्या नऊ मिनिटात पूर्ण केलंय.