मुंबई: मुंबईजवळील अरबी समुद्रात ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरमध्ये 9 जण होते. 7 प्रवासी आणि 2 वैमानिक असलेल्या हेलिकॉप्टरचे मुंबई हाय येथील ONGC रिग सागर किरण जवळ अरबी समुद्रात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. चार जणांना वाचवण्यात यश आले आहे. तेल आणि नैसर्गिक वायू कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) ने ट्विट केले आहे. बचाव कार्य सुरू आहे. तटरक्षक जहाज घटनास्थळी पोहोचण्यासाठी वळवले आहे. तसेच बचाव कार्यात सामील होण्यासाठी आणखी एक जहाज मुंबईहून रवाना झाले आहे, अशी माहिती भारतीय तटरक्षक दलाने दिली आहे
The nine persons include 2 crew members; i.e. 7 pax and 2 crew. Now, 5 have been rescued https://t.co/CdaL46lDJZ
— Oil and Natural Gas Corporation Limited (ONGC) (@ONGC_) June 28, 2022
तटरक्षक दल भारतीय नौदल आणि ओएनजीसी यांच्याशी समन्वय साधत आहे.