मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत आरेतच मेट्रो 3 चं कारशेड (Metro 3 Car Shed) होणार असल्याचं म्हटलं. या निर्णयामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पर्यावरण प्रेमींनीही नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाविरोधात पर्यावरणवाद्यांनी उद्या रविवारी 3 जुलैला आंदोलनाची हाक दिली आहे. (environmental groups agitation for save aarey forest on sunday 3 july at picnic spot against to cm eknath shinde metro 3 car shed in aarey)
आरे वाचवण्यासाठी या आंदोलनात सामिल व्हा, असं आवाहनही पर्यावरणवाद्यांकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे कारशेड परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
पर्यावरणवाद्यांनी मुंबईकरांना सोशल मीडियाद्वारे 'सेव्ह आरे फॉरेस्ट'ची (Save Aarey Forest) हाक दिली आहे. "आरे जंगल वाचवण्यासाठी आपण भगवान हनुमानाला प्रार्थना करू, मुंबईकरांनो या आणि आंदोलनात सामिल व्हा", असं आवाहन या सोशल मीडियाद्वारे करण्यात आलंय.
'सेव्ह आरे फोरेस्ट' हे आंदोलनाला सकाळी 11 वाजता सुरुवा होणार आहे. हे आंदोनल आरे कॉलनीत पिकीनिक पॉइंट (यूनिट नंबर 20) इथे बिरसा मुंडा चौकात होणार आहे.
या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पर्यावरणप्रेमी आणि मुंबईकर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याआधीही झालेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात पर्यावरणवाद्यांनी आंदोलनाला उपस्थित राहून आरेत कारशेड करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून या आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.