सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : एका शेतकऱ्याने मंत्रालयासमोर भाजीपाला आणून टाकला आहे. उस्मानाबादचा हा शेतकरी पिकवलेला भाजीपाला मुंबईत आठवडी बाजारात आणतो. मात्र मागील काही दिवसांपासून मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप शेतकरी उमेश शिंदे यांनी केला आहे. आपण विकायला आणलेला माल अधिकारी आणि पोलीस फेकून देतात. नाहक दंड करतात असा आरोप त्यांनी केला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना झुकते माप देण्यासाठी शेतकऱयांना त्रास देण्यात येतो, असा आरोप शेतकरी उमेश शिंदे यांनी केला आहे.
या शेतकऱ्याने आज निषेध करताना हजारो रूपयांचा भाजीपाला मंत्रालयासमोर फेकून दिला. या प्रकरणी शेतकरी उमेश शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
यातील उल्लेखनीय बाब म्हणजे गृहमंत्रालय हे मुख्यमंत्र्यांकडे आहे, आणि मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तेव्हा शेतकऱ्याचा आरोप आहे की त्याला पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी त्रास देतात. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर लक्ष घालतील का? आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष बीएमसीच्या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करतील का?.