मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या रकमा आजपासून बँकांमध्ये जमा होणार असल्याचं सरकारचं आश्वासन फोलच ठरताना दिसतंय. राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीसाठी आवश्यक रकमा जमा झालेल्या नाहीत.
मुख्यमंत्री आणि राज्य स्तरिय बँक व्यवस्थापकांच्या बैठकीत आजपासून पहिल्या टप्प्प्यात लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याचं निश्चित झालं. पण आज फक्त माहितीची देवाणघेवाणीची प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा होण्यास सोमवार उजाडेल असंच बहुतांश जिल्हा बँकांचं म्हणणं आहे.
खरंतरं 18 ऑक्टोबरला मुख्यमंत्री फ़डणवीसांच्या हस्तेकर्जमाफीची प्रमाणपत्र देऊन मुंबईसह राज्याच्या सर्वच जिल्ह्यात कागदोपत्री पहिल्या टप्प्यात 8 लाख 40 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र अद्याप एक पैसाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.