सोमवारपासून कर्जमाफीची प्रक्रिया, शेतकऱ्यांना द्यावी लागणार ही माहिती

शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सोमवारपासून सुरु होत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन केंद्र उभारण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Updated: Jul 23, 2017, 08:15 PM IST
सोमवारपासून कर्जमाफीची प्रक्रिया, शेतकऱ्यांना द्यावी लागणार ही माहिती title=

मुंबई : शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सोमवारपासून सुरु होत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन केंद्र उभारण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाईन फॉर्म प्रक्रिया असणार आहे. हे ऑनलाईन फॉर्म स्वीकारण्याकरता २५ हजार केंद्र आपले सरकार या माध्यमातून प्राधिकृत केलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ऑनलाईन फॉर्मचं केंद्र असणार आहे. हा फॉर्म भरताना शेतकऱ्यांना अकाऊंट नंबर, आधार नंबर, कुटुंबातील अकाऊंट नंबर आणि डिक्लेरेशन (कोणत्या कॅटेगरीमध्ये नाही) अशी माहिती मागवणार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मागच्या कर्जमाफीवेळी घोस्ट अकाऊंटला पैसे जमा झाल्यामुळे असं केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

२५ हजार केंद्रांचा आकडा लक्षात घेता १० ते १२ दिवसांमध्ये अर्ज प्रक्रियेत येतील. यामध्ये बायोमेट्रिक केले जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकरी आंदोलनावेळच्या सुकाणू समितीमध्ये काही नेते जरूर होते पण काही हवशे नवशेही होते असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.