शेतकरी संपाची सुकाणू समितीची बैठक

शेतकरी संपाची सुकाणू समितीची बैठक माहीम कोळीवाड्यातील शेकाप भवनमध्ये सुरु आहे. या बैठकीसाठी राजू शेट्टी, जयंत पाटील, अजित नवले, अशोक ढवळे, प्रतिभा शिंदे, बी जी कोळसे पाटील, बैठकीसाठी उपस्थित आहेत. प्रहार संघटनेचे प्रतिनिधी देखिल उपस्थित आहेत.

Updated: Jun 10, 2017, 06:00 PM IST
शेतकरी संपाची सुकाणू समितीची बैठक title=

मुंबई : शेतकरी संपाची सुकाणू समितीची बैठक माहीम कोळीवाड्यातील शेकाप भवनमध्ये सुरु आहे. या बैठकीसाठी राजू शेट्टी, जयंत पाटील, अजित नवले, अशोक ढवळे, प्रतिभा शिंदे, बी जी कोळसे पाटील, बैठकीसाठी उपस्थित आहेत. प्रहार संघटनेचे प्रतिनिधी देखिल उपस्थित आहेत.

उद्या सरकारनं नेमलेल्या मंत्रिगटाशी सुकाणु समितीचे सदस्य चर्चा करणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर उद्याची रणनिती ठरवण्याठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. सरकारी चर्चा करायची की, नाही या मुद्द्यावरुन सुकाणू समितीमध्ये दोन गट पडले आहेत.