Petrol Pump : राज्यात पेट्रोल-डिझेलची टंचाई होण्याची भीती आहे. कारण 31 मेपासून डेपोमधून इंधन न घेण्याचा निर्णय पंप चालकांची संघटना फामपेडानं घेतलाय. इंधन दरांमध्ये सातत्यानं चढ-उतार झाल्यामुळे नुकसान होत असून त्यामुळे कमिशन वाढवून द्यावं, अशी मागणी संघटनेनं केलीये. याबाबत नियंत्रक आणि सरकारला पत्र लिहिलंय. यावर मार्ग न काढल्यास 31 तारखेपासून डेपोमधून इंधन विकत घेतलं जाणार नाही, असा इशारा देण्यात आलाय.
इंधन खरेदीवर बहिष्कार?
देशात पेट्रोल आणि डिझेल दरात भरमसाठ वाढ झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका झाली. त्यानंतर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केंद्र सरकारने कपात केली. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. पण त्यामुळे पेट्रोल-डिझेल चालक आणि मालक मात्र आक्रमक झाले आहेत.
पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्याने मोठा फटका बसत असल्याचं फामपेडाने म्हटलं आहे. पेट्रोल-डिझेल व्यावसायात असलेली गुंतवणूक मोठी आहे. दर कपात झाल्यामुळे गुंतवणूक कमी करावी लागते, पण दरकपात झाल्यानंतर होणारातोटा देखली मोठा असतो, त्यामुळे दर कपात करताना अचानकपणे होता कामा नये असं फामपेडाने म्हटलं आहे.
त्यामुळे देशभरातील चालक-मालकांनी डेपोमधून इंधन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं फामपेडाने म्हटलं आहे. सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारे याचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेतल्याचंही फामपेडाने म्हटलं आहे.