जेव्हा आपल्या जीवनाला अद्ययावत करण्याचा विषय येतो तेव्हा आपण सामान्यत: त्याचा संबंध एक्सेसरीज, गॅजेटस किंवा उपकरणांसोबत जोडतो. सामान्यत: त्यामध्ये अद्ययावत घटक असलेल्या नवीन स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या खरेदीचा समावेश असतो. दुर्दैवाने आपण आपल्या घरांकडे दुर्लक्ष करतो व अनेक वर्षं आपल्या घरातील वस्तुंना ‘अपग्रेड’ करण्याकडे दुर्लक्ष करतो. आपण चित्र विचित्र आवाज, वाढलेला विजेचा खर्च सहन करू लागतो व अतिरिक्त खर्च आणि गैरसोयींसोबत जगत जातो.
महामारीने आपल्या जीवनशैलीला बदलले आहे आणि आपल्याला जास्त वेळ घरात राहण्यास भाग पाडले आहे. आपल्या विशिष्ट गरजांची पूर्तता करणा-या उपकरणांकडे आपण जास्त लक्ष देणे सुरू केले आहे. आपण विचारात घेतो त्या बाबींमध्ये ऊर्जेच्या बचतीचे रेटिंग्ज हाही एक महत्त्वाचा घटक ठरतो. मुळात, जर आपण एक दशकाच्या अवधीसाठी ऊर्जेच्या बाबतीत परिणामकारक नसलेले मोठे उपकरण जर वापरत असाल, तर केवळ नवीन तंत्रज्ञानाकडे वळल्यामुळे अनेक वर्षांमधील आपल्या गुंतवणुकीमध्ये खूप जास्त बचत होऊ शकते.
हे लक्षात घेऊन, भारतात वाढलेल्या ई- कॉमर्स मार्केटप्लेस असलेल्या फ्लिपकार्टने एक उत्पादन एक्स्चेंज करण्याचा कार्यक्रम बनवला आहे- ‘प्रेक्सो’ ज्यामध्ये आपण पंखे, कूलर ते गीजर आणि मिक्सर ग्राइंडर्स अशी घरातील कित्येक उत्पादने वाजवी पद्धतीने अपग्रेड करू शकता. टिकाऊ आणि वाजवी दरातील निर्मिती असलेल्या फ्लिपकार्टच्या ग्राहकांसाठीच्या व्यापक वस्तुंमधून इथे अशी काही होम अप्लायन्सेस आहेत जी आपण ह्या सणासुदीच्या दिवसांमध्ये अपग्रेड करू शकता:
पंखे आणि कूलर्स
ग्राहकांना दर वर्षी पंखे व कूलर बदलणे आवडत नाही. जेव्हा एअर कूलर्समधून पाणी गळते किंवा कंप्रेसर बदलण्याची गरज पडते, तेव्हा अपग्रेड करण्याची गरज उद्भवते. फ्लिपकार्टद्वारे अनेक श्रेणीमधील ऊर्जेचा परिणामकारक वापर करणारे सिलिंग फॅन्स आणि रिमोट कंट्रोल पर्याय असलेले एअर कूलर्स उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. वेगाच्या नियंत्रणासह आपण शेड्युल करण्यासाठी टायमर वैशिष्ट्याचाही वापर करू शकता आणि अनेक रोटेशन मोडसमध्ये स्विचही करू शकता. अडचण विरहित अनुभवासाठी आपल्या जुन्या सिलिंग फॅनच्या जागी एक अद्ययावत नवीन स्मार्ट सिलिंग फॅन आणा.
रिमोट 3 ब्लेड सिलिंग फॅनसह ओरिएंट इलेक्ट्रिक एरोक्विट 1200 मिमी बीएलडीसी मोटर
उशा ब्लूम प्रिमरोज 1250 मिमी 380 ब्लेड सिलिंग फॅन
हिंदवेअर 85 एल डेझर्ट एअर कूलर
कॉर्डलेस आणि रोबोट व्हॅक्युम क्लीनर्स-
कोणत्याही घरासाठी व्हॅक्युम क्लीनर्स ही एक चांगली गुंतवणूक असते. ते चालवण्यासाठी सोपे असतात आणि प्रत्यक्ष फरशी पुसून साफ करण्याचा ताण कमी करतात. वाढलेली परिणामकारकता आणि आपल्या व्यक्तिगत कामासाठी मोकळा वेळ हा लाभ अतिशय महत्त्वाहा आहे. जेव्हा आपण घराच्या बाहेर असता, तेव्हाही रोबोटीक व्हॅक्युम मॉप्सला त्यांचे काम करण्यासाठी प्रोग्राम केले जाऊ शकते आणि ते आपला स्मार्टफोन वापरून वाय-फायद्वारे नियंत्रित केले जाऊ शकतात. परंतु कालांतराने त्यांचा आवाज वाढतो व
त्यांच्या सक्शनची क्षमता कमी होते व त्यामुळे ते फरशीवरील कचरा उचलू शकत नाहीत. फ्लिपकार्टमध्ये आपण निवडण्यासाठी रोबोट आणि कॉर्डलेस व्हॅक्युम क्लीनर्सची अतिशय मोठी श्रेणी उपलब्ध आहे.
एंकर रोबोव्हॅकद्वारे ऑफी
रोबोटीक व्हॅक्युम क्लीनर्स
डायसन V7 एनिमल कॉर्डलेस व्हॅक्युम क्लीनर
कॉर्डलेस व्हॅक्युम क्लीनर्स
वॉटर प्युरिफायर
काही काळाने वॉटर प्युरिफायर्स बॅक्टेरिया आणि अन्य हानीकारक कण फिल्टर करण्याची आपली क्षमता गमावतात व त्यामुळे चव विपरित होते, पाणी गळते व दुर्गंध येतो. पाण्यातून पसरणा-या रोगांपासून आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी असे सांगितले जाते की, न विरघळलेल्या अशुद्धता काढून टाकण्यासाठी अनेक प्युरिफिकेशन स्टेजेस असलेल्या अद्ययावत मॉडेल्सच्या वॉटर प्युरिफायर सिस्टीमकडे आपण अपग्रेड केले पाहिए. पाण्याची गुणवत्ता, फिल्टर अवधी, युव्ही स्टर्लायजेशन स्टेटस आणि इतर अनेक बाबींवर निगराणी करण्यात आपली मदत करणा-या अनेक उत्पादनांमधून आपण निवड करावी.
एक्वागार्ड ग्लोरी 6 ली आरओ + युव्ही + एमटीडीएस
केंट एस 8 ली आरओ + युव्ही + यूएफ + टीडीएस वॉटर प्युरिफायर
एचयूएल कडून प्यूअर इट ऍडव्हान्सड मॅक्स 6 ली मिनरल आरओ + युव्ही + एमएफ + एमपी वॉटर प्युरिफायर
मायक्रोवेव्ह ओव्हन्स
मायक्रोवेव्ह ओव्हन्स ग्रिलिंग, पुन: गरम करण्यासाठी आणि बेकिंगसाठीही आता अपरिहार्य असे घरातील गॅजेटस बनले आहेत. पारंपारिक ओव्हनपेक्षाही ते अधिक परिणामकारक प्रकारे ऊर्जेचा वापर करतात,
कारण त्यामध्ये खाद्य अधिक वेगाने शिजवले जाते व 70- 80 टक्के कमी ऊर्जा लागते. वापरण्याच्या प्राधान्याच्या आधारे निवडण्यासाठी फ्लिपकार्टमध्ये अनेक प्रकारचे मायक्रोवेव्ह ओव्हन्स उपलब्ध आहेत.
आयएफबी 30 ली कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन
एलजी 21 ली कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन
आयएफबी 30 ली कॉन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन
गीजर्स
जरी त्यांना अनेकदा हाय पॉवर रेटिंग्ज दिले जात असले तरी घरातील रोजच्या कामांमध्ये गीजर्स महत्त्वाचा भाग बनले आहेत. त्यामुळे युटिलिटी बिल्सवर, विशेषत: हिवाळ्याच्या सुरुवातीच्या काळात पैशांच्या बचतीसाठी ऊर्जेचा परिणामकारक वापर करणा-या हीटर्समध्ये गुंतवणूक करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. गीजर विकत घेताना ह्या मुख्य गरजा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे- विजेचा वापर, क्षमता व पाणी गरम करण्यासाठी लागणारा वेळ. असे काही पर्याय खाली दिलेले आहेत:-
एओ स्मिथ 25 ली स्टोरेज वॉटर गीजर (एसईएस- ग्रीन-025, पांढरा)
हॅवेल्स 25 ली स्टोरेज वॉटर गीजर
बजाज 25 ली स्टोरेज वॉटर गीजर
किचन चिमनी
किचन चिमनी हे किचनमधील असे उपकरण असते जे आपले घर दुर्गंधांपासून मुक्त ठेवते व हवेतील विषारी प्रदूषक घटक काढून टाकते. आपल्या किचन काउंटरटॉपवरून तेलाचे डाग व धूर लागलेले कण स्वच्छ करण्यामध्ये आपल्याला लागणा-या वेळेमध्येही ते मोठी बचत करते. काळानुसार चिमनीची शोषून घेण्याची क्षमता कमी होत जाते आणि म्हणून शोषण्याची उच्च क्षमता असलेल्या अद्ययावत मॉडेल्सच्या चिमनीला आधीच्या चिमनीच्या जागी आणणे महत्त्वाचे असते. आवाज न करणा-या कामासाठी आपण सायलेंट किट असलेली चिमनी किंवा आपल्या किचन सजावटीसोबत मॅच होणारी चिमनीही निवडू शकता.
हिंदवेअर ग्रेटा ऑटोक्लीन 60
हिंदवेअर ऑप्टीमस आई - प्रो 60 ऑटोक्लीन वॉल माऊंटेड चिमनी
हिंदवेअर अटलांटा 90 सायलेन्स ऑटोक्लीन वॉल माऊंटेड चिमनी
ऑक्टोबरच्या मध्यापासून ग्राहक फ्लिपकार्टवर आपले जुने ज्युसर्स, मिक्सर्स आणि ग्राइंडर्स नवीन ब्रँडेड वस्तुंसाठी एक्स्चेंजसुद्धा करू शकतात.
उत्पादन एक्स्चेंजचे मुख्य लाभ काय आहेत?
नवीन वस्तुंसाठी आपली उपकरणे व इलेक्ट्रॉनिक वस्तु एक्स्चेंज करून घेण्यासाठी ग्राहकांना प्रेक्सो हा एक अडचण विरहित पर्याय उपलब्ध आहे. ह्या एक्स्चेंज कार्यक्रमाचे मुख्य लाभ असे आहेत:
1. जुन्या उपकरणासाठी मोठे मूल्य
2. डिलिव्हरीच्या वेळी आपल्या दाराशी कोणतीही अडचण न येता निवड
नवीन उपकरणासाठी आपण आपल्या जुन्या अप्लायन्सला कसे एक्स्चेंज करू शकता?
फ्लिपकार्टवर आपल्या पसंतीचे अप्लायन्स ऑर्डर करताना ग्राहकांना त्यांच्या जुन्या अप्लायन्सचे तपशील देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तपशील एंटर केल्यानंतर जुन्या अप्लायन्ससाठी देण्यात आलेली रक्कम नवीन अप्लायन्सच्या किमतीमधून वजा केली जाते.
● एकदा एक्स्चेंजसह ऑर्डर दिल्यानंतर नवीन अप्लायन्सच्या डिलिव्हरीच्या वेळी, प्रशिक्षित फ्लिपकार्ट एक्झिक्युटीव्हज एक्स्चेंज करण्यात येणा-या जुन्या अप्लायन्सेसची पडताळणी करतील.
● जर जुने अप्लायन्स निकषांची पूर्तता करत असेल, तर ते स्वीकारले जाते. जर अप्लायन्स रिजेक्ट केले जात असेल, तर ग्राहकाला फरकाची रक्कम भरणे आवश्यक असेल.