close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अंधेरीत बहुमजली इमारतीला आग, बचावकार्य सुरू

अग्निशमन दलाच्या जवानांनी चाळीस जणांना सुरक्षितपण बाहेर काढले आहे. 

Updated: Oct 14, 2019, 03:07 PM IST
अंधेरीत बहुमजली इमारतीला आग, बचावकार्य सुरू

मुंबई : अंधेरीत वीरा देसाई रोड परिसरात असलेल्या बहुमजली इमारतीला आग लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. देसाई रोडवरील पेनसुला इमारतीला ही आग लागली आहे. फायर ब्रिगेडच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी चाळीस जणांना सुरक्षितपण बाहेर काढले आहे. इमारतीत काहीजण अडकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  

इमारत १७ मजली असून एसीमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.