घाटकोपरच्या गोदामाला लागलेली आग तीन तासांनंतरही विझेना

या आगीत अजूनही जीवित हानी झाल्याची बातमी नाही

Updated: Dec 27, 2019, 08:35 PM IST
घाटकोपरच्या गोदामाला लागलेली आग तीन तासांनंतरही विझेना   title=

मुंबई : मुंबईमध्ये पुन्हा एकदा दाटीवाटीच्या भागात भीषण आग लागल्याची घटना घडलीय. घाटकोपरच्या खैराणी रोडवर असणाऱ्या एका गोदामाला आगीच्या ज्वाळांनी घेरलंय. अग्निशमन दल गेले तीन तासा ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. सायंकाळी ५.०० वाजल्याच्या दरम्यान गोदामाला आग लागलीय. या आगीत अजूनही जीवित हानी झाल्याची बातमी नाही. या परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.  

साकीनाका खैराणी रोडवर असलेल्या आशापुरा कंपाउंडमध्ये ही आग लागली. या कंपाउंडमध्ये केमिकल, कपडे, भंगार तसेच रेडिमेड कपड्याचे तसेच लाकडी सामानाचे गोदाम आहे.

अग्निशमन दलाच्या आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आग अजूनही वाढतच आहे सुमारे तीन तास होण्यास आले तरी अजून ही आगीवर नियंत्रण मिळवता येते नाही, त्यामुळे अग्नीशमन दलाकडून लेव्हल ४ ची वर्दी देण्यात आली आहे. 

या ठिकाणी ८ बंब, ९ नऊ टँकर तसेच ऍम्बुलन्स दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशमन दल करत आहे याची चौकशी करण्याची मागणी स्थानिक आमदारांनी केली आहे.