मुंबई : मुंबईच्या राजकारणातील आताची मोठी बातमी आहे. मुंबईचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख (Aslam Shaikh) सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. अस्लम शेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या भेटीस सागल बंगल्यावर आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे मोहित खंबोजही (Mohit Kamboj) फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
अस्लम शेख आणि मोहित खंबोज हे एकाच गाडीतून देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहेत.
अस्लम शेख हे काँग्रेसचे मुंबईतला एक मोठा चेहरा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. भेटीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान भाजपे नेते किरीट सोमय्या यांनी काल अस्लम शेख यांच्यावर आरोप केले होते, यासंदर्भात ही भेट आहे का याबाबतही चर्चा रंगली आहे.
किरीट सोमय्या यांनी काय केले होते आरोप
किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्या तब्बल 300 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. महाविकास आघाडी हे लुटारू सरकार होतं. गेल्या 2 वर्षात काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांनी मालवणी, मढ या भागात तब्बल 28 फिल्म स्टुडिओंचे कमर्शियल बांधकाम सुरु केलं आहे. यातील ५ स्टुडिओ हे सी.आर. झेड झोनमध्ये आहेत. मंत्रालयाने फक्त फिल्म सेट लावण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने तिथे 10 लाख स्केअर फूटची जागा मोकळी करून 28 स्टुडिओ बांधण्यात आले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.