FYJC Admission: अकरावी प्रवेशासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे. अकरावीत प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षणाचे लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता असते. प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडे हे प्रमाणपत्र असणे गरजेचे असते. हे प्रमाणपत्रा सादर न केल्यास विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी केल्या अर्जाची पोहचपावती घेऊन प्रवेश देण्यात येत आहे. दरम्यान आता ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे.
मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (MMRDA), पुणे व पिंपरी - चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये/ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रिय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येतात.
सन 2023-24 ची अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून प्रथम फेरीचे प्रवेश दिनांक 21 जून 2023 पासून सुरु करण्यात आले आहेत. इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन-क्रिमी लेअर) प्रमाणपत्र आणि EWS प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी EWS प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
तथापि, विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे(नॉन-क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच EWS प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या बाबीचा विचार करुन इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून पोहोच पावती किंवा हमीपत्र घेऊन 3 महिन्यांची मुदतवाढ देऊन कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
बकरी ईदनिमित्त बुधवारी जाहीर करण्यात आलेली सुट्टी शासनाकडून मागे घेण्यात आली. तसेच गुरुवारी 29 जून रोजी ही सुट्टी देण्यात आली. सर्व शासकीय विभागांना याबद्दलची माहिती कळविण्यात आली. याचा परिणाम मुंबई विद्यापिठाकडून सुरु असलेल्या प्रवेश प्रक्रियेवर झाला आहे. सर्व महाविद्यालयांना यासंदर्भात सुचना देण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, महाराष्ट्र शासनाकडून बुधवार, 28 जून रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. बकरी ईदचा सण गुरुवार, 29 जून रोजी येत असल्याने 28 जूनला देण्यात आलेली सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक रद्द करण्यात आले आहे.
ही प्रवेश प्रक्रिया 12 जूनच्या परिपत्रकानुसार घेण्यात येणार आहे. तसेच प्रवेशाची दुसरी यादी 28 जून रोजी जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.