'गणेश विसर्जन आपल्या दारी', भाजपची संपर्क मोहीम

 मुंबईत भाजपच्या युवा मोर्चाची संकल्पना

Updated: Aug 22, 2020, 07:19 PM IST
'गणेश विसर्जन आपल्या दारी', भाजपची संपर्क मोहीम title=

मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोहचत लोकप्रियता कायम ठेवण्याचा, संपर्कात रहाण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करत असतो. मुंबईत भाजपच्या युवा मोर्चाने अशीच एक शक्कल लढवली आहे. 

कोरोना काळांत विसर्जनासाठी दूर जावे लागू नये म्हणून ' गणेश विसर्जन आपल्या दारी ' हा उपक्रम राबवला आहे. यामध्ये मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात फिरते हौद - पाण्याची टाकी उपलब्ध करून दिली आहे. 

ज्यांना घरातील गणेश मूर्तीचे विसर्जन करायचे आहे, त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये भाजपचे हे फिरते वाहन संबंधित व्यक्तीच्या घराजवळ जात तिथेच विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

पंकजा मुंडेंची नवी इनिंग 

पंकजा मुंडे यांनी पुन्हा नव्याने राजकीय इनिंग सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. परदेशवारी झाल्यावर परत आल्यावर, कोरोना संकट दूर झाल्यावर, जनजीव सुरळीत झाल्यावर पुन्हा एकदा पूर्वीच्या झंझावाताप्रमाणे, ताकदीने समाजाच्या सेवेसाठी उतरण्याचा निश्चय गणपती पुढे केल्याची भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.