बदलापूर : एमआयडीसी भागात वायू गळती झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पाहायला मिळत आहे. एमआयडीसी भागातील नोबल इंटर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून वायूची गळती झाली आहे. वायूगळती झाल्यामुळे सुमारे ३ की.मी. परिसरातील शिरगाव , आपटे वाडी परिसर प्रभावित झाला आहे. परिसरातील नागरिकांना श्वास घेणे , डोळे चुरचुरणे , उलट्या होणे , मळमळणे यांसारखे त्रास झाले. रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली
#WATCH | A gas leak from a factory in Maharashtra's Badlapur was reported at around 10:22 pm on Thursday. People in the area were having trouble breathing. Fire brigade stopped the leak at 11:24 pm. The situation is under control. No one injured: Thane Municipal Corporation pic.twitter.com/djdZY77DAE
— ANI (@ANI) June 3, 2021
कुत्र्यांसाठी लागणारे खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कंपनीत ओव्हरहिट मूळे सल्फुरीक ऍसिड आणि बेंझिल्स ऍसिडमध्ये केमिकल रिऍक्शन झाल्याने ही घटना घडली .मात्र या वायू गळतीमुळे संपूर्ण परिसरात सर्वत्र धुर पसरला होता. धुरामुळे समोरचं पूर्ण अंधूक दिसत होतं. घटनेची माहिती मिळताचं बदलापूर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गॅस गळती थांबवली
रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली , मात्र मात्र एवढी मोठी घटना घडली असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे एकही कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाहीत. या भागात वारंवार गॅस गळतीच्या घटना घडत असून प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांचा केला आहे.