गहना वशिष्ठचा मुंबई पोलिसांवर खळबळजनक आरोप;15 लाख रुपयांची लाच मागितल्याचा दावा

पॉर्न आणि अश्लिल चित्रपट निर्मितीचे आरोप असलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ उर्फ वंदना तिवारीने आता उलट मुंबई पोलिसांवरच आरोप लावले आहेत

Updated: Aug 1, 2021, 10:18 AM IST
गहना वशिष्ठचा मुंबई पोलिसांवर खळबळजनक आरोप;15 लाख रुपयांची लाच मागितल्याचा दावा

मुंबई : पॉर्न आणि अश्लिल चित्रपट निर्मितीचे आरोप असलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ उर्फ वंदना तिवारीने आता उलट मुंबई पोलिसांवरच आरोप लावले आहेत. गहहनाचे म्हणणे आहे की, 'मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर पॉर्न केस प्रकरणात राज कुंद्रा आणि एकता कपूर यांचे नाव घेण्यावर दबाव आणला होता'.

गहनाने हाही दावा केलाय की, 'मुंबई पोलिसांनी या केसमध्ये तिचे नाव न घेण्याच्या बदल्यात 15 लाख रुपयांची मागणी केली.'

एका वृत्तवाहिनीशी बोलताना गहनाने म्हटले की, 'पोलिसांनी तिला 15 लाख रुपयांची मागणी केली. त्याबदल्यात तिला अटक करण्यात येणार नाही'. याचप्रकरणी तिला यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्यावेळी ती 4 महिने तुरुंगात राहिली होती. मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात एक नवी एफआयआर फाइल केली होती. त्यात तिचे नाव सामिल केले होते.

गहना ने मान्य केले की राज कुंद्रासाठी बनवल्या बोल्ड फिल्म्स
गहनाने म्हटले की, मी मान्य करते की, राज कुंद्राचे मोबाईल ऍप हॉटशॉटसाठी काही बोल्ड व्हिडिओजमध्ये काम केले. परंतु ते व्हिडिओ पॉर्न नव्हते. पोलिसांचा आरोप आहे की राज कुंद्रा पॉर्न व्हिडिओ बनवण्याच्या रॅकेटचे सूत्रधार आहेत. 
तसेच, मी मुंबई पोलिसांना पैसे दिले नाहीत, कारण मला माहितीये की मी काही चुकीचे केलेले नाही. यासाठी मी पुन्हा पुन्हा म्हणतेय की, राज कुंद्रानेसुद्धा काही चुकीचे केलेले नाही.

पोलिसांनी मला धमकावले.
गहनाने दावा केला आहे की, पोलिसांनी तिला धमकी दिली. जर तिने पोलिसांचे ऐकले नाही तर, परिणाम भोगावे लागतील. मी सार्वजनिकरित्या लोकांमध्ये हे सांगू इच्छित नव्हते. परंतु पोलिसांनी असं करण्याला मला मजबूर केले.