भाषणादरम्यान अजित पवारांना लहान मुलाने फोडला घाम

छोटा पुढारी घनश्याम दराडेने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासमोर भाषण केलं.

Updated: Jun 22, 2018, 06:39 PM IST

मुंबई : छोटा पुढारी घनश्याम दराडेने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासमोर भाषण केलं. भाषणासाठी त्याने अवघे ५ मिनिटं मागितले, पण या ५ मिनिटांत त्याने, एखाद्या मुरब्बी पुढाऱ्यासारखं भाषण करून उपस्थित पुढाऱ्यांना घाम फोडला. यावेळी समोर अजितदादा तर होते, पण सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. घनश्याम दराडेच्या भाषणाचा हा व्हिडीओ जुना आहे, पण नेटीझन्सना पुन्हा पुन्हा ऐकायला हा व्हिडीओ भाग पाडतोय. घनश्याम दराडेला छोटा पुढारी म्हणून महाराष्ट्रात ओळखतात.