'फर्जंद'ला मुंबईत प्राईम टाईम नाही, मनसेचा खळखट्याकचा इशारा!

फर्जंद हा छत्रपती शिवाजी महाराजांवरचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात मराठी बांधवांनी डोक्यावर घेतला आहे.

Updated: Jun 6, 2018, 05:23 PM IST

मुंबई : फर्जंद हा छत्रपती शिवाजी महाराजांवरचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात मराठी बांधवांनी डोक्यावर घेतला आहे. सर्वच ठिकाणी या चित्रपटाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र मुंबईत या चित्रपटाला प्राईम टाईमची वेळ देण्यात आलेली नाही. त्यामुळे मराठी रसिकांचा हिरमोड झाला आहे. या विरोधात आता मनसे मैदानात उतरणार आहे. लवकरात लवकर फर्जंद चित्रपटाला प्राईम टाईमचा वेळ दिला गेला नाही, तर मनसे स्टाईलनं खळखट्याक आवाज काढला जाईल असा इशाराच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनं दिलाय.