मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी : मेट्रो रेल्वेगाडीच्या प्रारूपाचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

 फेब्रुवारीपासून प्रत्येक महिन्यात दोन रेल्वेगाड्या येतील.

Updated: Jan 17, 2021, 11:41 AM IST
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी : मेट्रो रेल्वेगाडीच्या प्रारूपाचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

मुंबई : मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन मार्गिकांवर धावणाऱ्या मेट्रो रेल्वेपैकी पहिली गाडी २७ किंवा २८ जानेवारीला मुंबईत दाखल होईल. त्यानंतर २९ जानेवारीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तिचे अनावरण केले जाण्याची शक्यता आहे.  

मेट्रो २ ए या डीएन नगर ते दहिसर मार्गावर आणि मेट्रो ७ अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या एकूण ३५ किमी मार्गावर जूनपर्यंत सेवा सुरू करण्याचं उद्दीष्ट आहे. मेट्रो गाड्यांची बांधणी बंगळूरुच्या भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड येथे सुरू आहे. 

मेट्रो रेल्वेगाडीच्या प्रारूपाचे सप्टेंबर २०१९ मध्ये मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. फेब्रुवारीपासून प्रत्येक महिन्यात दोन रेल्वेगाड्या येतील. दोन्ही मार्गिकांवर मिळून सुरुवातीस दहा गाड्या धावतील.