स्वतःचे पाप जाळण्याचा प्रयत्न, हाथरसप्रकरणावरुन राऊतांची टीका

संजय राऊतांचा  योगी सरकारवर निशाणा

Updated: Oct 2, 2020, 01:39 PM IST
स्वतःचे पाप जाळण्याचा प्रयत्न, हाथरसप्रकरणावरुन राऊतांची टीका  title=

मुंबई : हाथरसमध्ये पीडित मुलीचा मृतदेह जाळला गेला. यातून स्वतः चे पाप जाळण्याचा प्रयत्न केला गेल्याच्या आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय. हिंदुत्वाच्या राज्यात हा प्रकार घडतो आणि रामराज्य म्हणवल जातं. पण ही दुर्देवी घटना पाहता सिता माई सुद्धा आक्रोश करत असेल असे म्हणत त्यांनी योगी सरकारवर निशाणा साधला.त्यावर विधी नुसार अंत्यसंस्कार झाले नाहीत. पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्यात आला. उत्तर प्रदेशमध्ये मीडियाच्या स्वातंत्र्यावर गँग रेप केला जातोय असे ते म्हणाले. यूपी बलात्कार आणि हत्याकांडच्या पार्श्वभुमीवर ते माध्यमांशी बोलत होते. 

पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यास जाणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांना यूपी पोलिसांनी अडवलं. या घटनेचा देखील राऊत यांनी निषेध केला. कुटूंबाला दहशतीत आणून धमक्या दिल्या जात आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  

या घटनेसंदर्भात देशभरात आक्रोश आहे. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जातोय.पंतप्रधानांनी समोर येऊन या घटनेवर निवेदन केले पाहिजे. 
एका नटीची भिंत पाडल्याचा हे प्रकरण नाही. ती नटी आता कुठे आहे ? अनेक दलित नेते त्या नटीच्या संरक्षणासाठी पुढे आले ते कुठे आहेत ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. 

यावेळी त्यांनी आगामी बिहार निवडणुकीवर देखील भाष्य केले. निवडणूक लढली पाहीजे या मताचा मी आहे. २४ तासात आम्ही बिहार निवडणुकी बाबत निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले.