मुंबई : कोरोना पुन्हा एकदा ़डोकं वर करत आहे. तिसरी लाट सुरू होत असतानाच पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं शिक्षणाचा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत शाळांबाबत महत्वाचा निर्णय सांगितला आहे. ओमायक्रॉनचे रूग्ण देखील सापडू लागले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.
शाळांमध्ये काही ठिकाणी विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याचं कळलंय. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. तसेच अहमदनगरला जे झालंय ते केस स्टडी म्हणून विचार केला जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले.(.. अन्यथा निर्बंध कठोर होणार, आरोग्यमंत्र्यांचा इशारा)
तसेच पॉझिटिव्ह झाले तरी मुलांचा आजार बळावत नाही, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते. त्यामुळे त्याचा धोका फार कमी आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सबरोबर चर्चा करून दोन दिवसात शाळांबाबत निर्णय घेतला जाईल.
राज्याला आठ दहा दिवसात २० जानेवारीपर्यंत ५ ते ६ हजार ऍक्टिव्ह रुग्ण होते. मात्र आता ११ हजार ०९२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज संध्याकाळी अंदाजे २२०० रुग्ण होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
मागील ७ दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा डबल झाले आहे. मुंबईत रोज ५१ हजार चाचण्या केल्या जात आहेत. यात २२०० पॉझिटिव्ह आले तर ४ टक्के पॉझिटीव्हीटी रेट मुंबईचा जात आहे. असं असेल तर चांगल नाही, काळजी घेण्याची गरज आहे, असं देखील यावेळी राजेश टोपे म्हणाले.
दिल्लीने कडक निर्बंध लावले आहेत. आपल्याकडे या गोष्टी सहजासहजी घेतल्या तर त्याची किंमत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल. नियम पाळावे लागतील अन्यथा निर्बंधात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा देखील यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री, टास्क फोर्स एकत्रित घेतील असं देखील टोपे यावेळी म्हणाले.
तातडीने टास्क फोर्सची बैठक घेतली जाईल. तसेच ओमायक्रॉन १६७ आहेत, ९१ डिस्चार्ज झालेत, मृत्यू नाही हे दिलासा देणारी बाब आहे, असं देखील टोपे यावेळी बोलले. पण त्यापेक्षा विविध व्हेरियंट आढळतायत आणि रुग्ण संख्या वाढतेय ही चिंतेची बाब आहे.