संजय दत्तचं वर्तन कोणत्या आधारे चांगलं ठरवलं?

अभिनेता संजय दत्तचं येरवडा कारागृहातील वर्तन कुठल्या आधारे चांगलं ठरवलं? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केलाय.  

Updated: Jun 12, 2017, 09:18 PM IST
संजय दत्तचं वर्तन कोणत्या आधारे चांगलं ठरवलं? title=

मुंबई : अभिनेता संजय दत्तचं येरवडा कारागृहातील वर्तन कुठल्या आधारे चांगलं ठरवलं? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केलाय.

तीन आठवड्यांमध्ये याचं उत्तर दाखल करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिलेत. शिक्षेतील बराचसा कालावधी संजय दत्त पॅरोलवर बाहेर असल्याचा आरोप आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी संजय दत्तला दिलेल्या सवलतीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी दरम्यान संजय दत्तच्या वर्तनाबाबत हायकोर्टनं सवाल केलाय.