Karnataka hijab controversy : कर्नाटकात (Karnataka) सुरु असलेल्या हिजाब वादाचे (Hijab Controversy) पडसाद आता महाराष्ट्रातही (Maharashtra) उमटू लागले आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी हिजाबच्या समर्थनार्थ मुस्लीम संघटनांकडून (Muslim Organisation) रस्त्यावर उतरल्या आहेत.
मुंबईत सह्यांचं कॅम्पेन
मुंबईत हिजाबच्या समर्थनार्थ मुस्लीम महिला (Muslim Women) रस्त्यावर उतरल्या असून मुस्लीम संघटनांकडून सह्यांचं कॅम्पेन (signature campaign) राबवलं जात आहे. देशात पाच राज्यात निवडणुका होत असून या पार्श्वभूमीवर राजकारण केलं जात असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान (Fauzia Khan) यांनी म्हटलं आहे. यात इतका मोठा वाद करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
हिजाबच्या समर्थनात ओवेसी
हिजाबच्या समर्थनार्थ उतरले AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसीही (Asaduddin Owaisi) सरसावले आहेत. कर्नाटक सरकारकडून राज्यघटनेची पायमल्ली सुरु असल्याचा आरोप करत ओवेस यांनी कर्नाटकातील भाजप सरकारचा (Karnataka BJP Government) निषेध केला आहे.
कोणतंही सरकार हे ठरवू शकत नाही की आम्ही काय खायचं आणि कोणते कपडे परिधान करायचे, कर्नाटकात भाजप सरकार संविधानविरोधात काम करत आहे, विद्यार्थिनींना महाविद्यालयात हिजाब घालण्यापासून रोखलं जात आहे, या निर्णयाचा आपण निषेध करत असल्याचं ओवेसी यांनी म्हटलं आहे.
मालेगावमध्ये मुस्लीम महिलांची रॅली
मालेगावात मुस्लीम महिला हिजाबच्या समर्थनात रस्त्यावर उतरल्या आहेत. प्रांताधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या विद्यार्थी आणि महिला सेलनं मोर्चा काढला. राष्ट्रवादी विद्यार्थी सेलच्या पदाधिकारी आणि विद्यार्थीनींनी एकत्र येत कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला. आंदोलकांनी हातात निषेधाचे फलक घेत मालेगावच्या सुपर मार्केट परिसरातून रॅली काढली. सरकारने ड्रेसकोड रद्द करावा आणि हिजाब व बुरख्यास परवानगी देण्याची मागणी आंदोलकांनी केली.
बीडमध्ये झळकले पोस्टर्स
बीड शहराच्या बशीर गंज चौकामध्ये पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. 'पहिले हिजाब फिर किताब' अशा आशयाचे पोस्टर्स याठिकाणी लावण्यात आलेले आहेत. या पोस्टर्समुळे सध्या शहरामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. फारुखी लखमानी विद्यार्थी सेनेच्या वतीने हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. हर किमती चीज परदे में होती है, Hijab is our Right असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.
'हिजाबचा वाद' कसा सुरू झाला?
हिजाबबाबतचा वाद उडपीमधील एका महाविद्यालयामधून सुरू झाला होता. या महाविद्यालयात गेल्या जानेवारीत हिजाबवर बंदी घालण्यात आली होती. हिजाब घातलेल्या मुलींना गेटवर थांबवण्यात आलं. यानंतर एका विद्यार्थिनीने कर्नाटक हायकोर्टात याचिका दाखल केली की, हिजाब घालण्याची परवानगी न देणं घटनाबाह्य आहे, असं विद्यार्थिनीचं म्हणणं होतं. त्यानंतर हा वाद आणखी वाढला.