मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी रविवारी घेतला. सर्वसामान्यांसाठी जरी ही आनंदाची बातमी असली तरीही यासाठी काही महत्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. 15 ऑगस्टपासून सर्वसामन्य नागरिकांना लोकल सुरू होणार आहे. (How to get Covid vaccination certificate on WhatsApp, Health Minister explains, It Will helped Mumbaikar for Local Train ) मात्र त्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्याचं सांगितलं आहे. अशावेळी कोरोना लसीचे सर्टिफिकेट अगदी सहज तुम्हाला व्हॉट्सऍपवर उपलब्ध होणार आहे.
आता तुम्हाला कोरोना लसीचे सर्टिफिकेट अवघ्या काही सेकंदात मिळणार आहे. याकरता या तीन स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
सर्वात पहिलं आपल्या रजिस्टर्ड मोबाइलवर +91 9013151515 हा नंबर सेव्ह करा
त्यानंतर व्हॉट्सऍप चॅट ओपन करून covid certificate टाइप करा
ओटीपी कन्फर्म करा.
Revolutionising common man's life using technology!
Now get #COVID19 vaccination certificate through MyGov Corona Helpdesk in 3 easy steps.
Save contact number: +91 9013151515
Type & send 'covid certificate' on WhatsApp
Enter OTPGet your certificate in seconds.
— Office of Mansukh Mandaviya (@OfficeOf_MM) August 8, 2021
कोरोनाचे डोस घेतलेल्यांना परवानगी मिळालेली आहे. पण आता यातून काही जण पळवाट शोधून गैरमार्गाने रेल्वे प्रवास करतील. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी एक सिस्टम सरकारने तयार केली आहे. त्यानुसार ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत त्या प्रवाशांना मोबाईल एपच्या (Mobile App) मदतीने रेल्वे पास डाऊनलोड करता येणार आहे.