वितरणाआधीच 'आदर्श शिक्षक' पुरस्कार वादात

वितरणापूर्वी शिक्षण विभागाने जाहीर केलेलं दोन पुरस्कार वादग्रस्त ठरलेत 

Updated: Sep 5, 2018, 09:28 AM IST

मुंबई : राज्य शासनातर्फे देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. शिक्षक दिनानिमित्त आज पुरस्काराचं वितरण होणार आहे. मात्र वितरणापूर्वी शिक्षण विभागाने जाहीर केलेलं दोन पुरस्कार वादग्रस्त ठरलेत. या दोन पुरस्कारांपैकी एक पुरस्कार रद्द तर एक पुरस्कार स्थगित ठेवण्याची शिक्षण विभागावर नामुष्की ओढावलीय. 

प्रक्रिया ऑनलाइन राबवूनही निवड वादग्रस्त ठरली. जालना जिल्ह्यातील रामनगर येथील शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक भाऊसाहेब गोरे यांना जाहीर झालेला आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द केलाय.

तर कोपर येथील च. बा. म्हात्रे विद्यामंदिरचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार यांच्या पुरस्काराल स्थगिती देण्यात आलीय.