आर्यनला दोन दिवसांत जमीन मिळाला नाही तर 16 दिवस वाढेल कोठडी

दोन दिवस आर्यनसाठी अत्यंत महत्त्वाचे...

Updated: Oct 28, 2021, 08:47 AM IST
आर्यनला दोन दिवसांत जमीन मिळाला नाही तर 16 दिवस वाढेल कोठडी title=

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. सलग दोन दिवस आर्यनच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज आर्यनसाठी महत्त्वाचा दिवस आहे. महत्त्वाचं म्हणजे 28 ऑक्टोबर किंवा 29 ऑक्टोबरपर्यंत आर्यनला जामीन मंजूर झाला नाही तर आर्यनला पुढचे 16 दिवस कोठडीत काढावे लागतील. त्यामुळे आर्यनसाठी आज आणि उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये कोणता  निर्णय होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

29 ऑक्टोबरनंतर न्यायालयचं कामकाज दिवाळीच्या सुट्टीमुळे बंद राहणार आहे. त्यामुळे न्यायालयाला दिवाळी आधी आर्यनच्या केसवर निर्णय देणं गरजेचं आहे. जर आज आर्यनला जामीन मंजूर झाला नाही तर त्याला 15 नोव्हेंबरपर्यंत कोठडीत राहावं लागेल. न्ययालयाच्या दिवाळीच्या सुट्ट्या 1 नोव्हेंबर 2021 पासून सुरू होत आहेत.

1 नोव्हेंबर ते 6  नोव्हेंबर पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहेत. 1 ते 12 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयाचं कामकाज बंद राहणार आहे. 13 - 14 नोव्हेंबर शनिवार - रविवार असल्यामुळे न्यायालय बंद असणार आहे. दिवाळीच्या सुट्टीपूर्वी 29 ऑक्टोबर हा मुंबई उच्च न्यायालयाचा शेवटचा कामकाजाचा दिवस आहे. यानंतर 15 नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालय सुरू होणार आहे.

दरम्यान, आर्यन खानसोबत अरबाझ मर्चंट आणि मूनमून धमेचा यांच्या जामीन अर्जावरही आज सुनावणी होणार आहे. मुंबईत समुद्रात क्रुझवर ड्रग्स पार्टी करणाऱ्या आर्यन खानसह आठ जणांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (NCB) अधिकाऱ्यांनी 2 ऑक्टोबरला अटक केली होती. त्यामुळे या दोन दिवसांत स्टारकिडला जामील मिळाला नाही तर त्यांच्या अडचणी वाढणार अशी शक्यता नाकारता येत नाही.