खबरदार! आई-वडिलांची काळजी घेतली नाहीत तर...

आई-वडिलांनी कमवलेली संपती मुलांना भेट म्हणून दिल्यानंतरही ते मुलांकडून परत घेऊ शकतात.

Updated: Jul 16, 2018, 05:07 PM IST
खबरदार! आई-वडिलांची काळजी घेतली नाहीत तर... title=

मुंबई: वृद्धापकाळात मुलांनी वाऱ्यावर सोडलेल्या पालकांच्यादृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. यापुढे मुलांनी आपल्या आई-वडिलांची काळजी घेतली नाही किंवा त्यांना वाईट वागणूक दिली तर अशा मुलांना वडिलोपार्जित संपत्तीवर पाणी सोडावे लागेल. 

आई-वडिलांनी कमवलेली संपती मुलांना भेट म्हणून दिल्यानंतरही ते मुलांकडून परत घेऊ शकतात. अंधेरीतल्या एका वृद्ध दाम्पत्याविरोधात संपत्तीच्या प्रकरणात केलेल्या याचिकेत उच्च न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्यामुळे कमवलेली संपत्ती मुलांकडून पुन्हा परत घेण्याचा अधिकार आता आई-वडिलांना प्राप्त झाला आहे.