मुंबई : INS विक्रांतच्या कथित मदतनिधी घोटाळाप्रकरणी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यानंतर त्यांचे पूत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांनाही उच्च न्यायालायाने दिलासा दिला आहे. तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
25 ते 28 एप्रिलदरम्यान चौकशीला हजर राहण्याचे निर्देश देतानाच चौकशीला हजर राहून तपासात सहकार्य करावं असं कोर्टाने नील सोमय्या यांना सांगितलं आहे.
संजय राऊत यांनी केला होता आरोप
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी INS विक्रांत मदतनिधीचा अपहार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पूत्र नील सोमय्या यांच्यावर केला होता. सेव्ह विक्रांतच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्य लोकांकडून 58 कोटी रुपये गोळा केले आणि नंतर ते पैसे नील सोमय्या यांच्या कंपनीमार्फत मनी लॉन्ड्रींग केले, असा आरोप संजय राऊत यानी केला होता.
तसंच एका माजी सैनिकांनेही याचप्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात ट्रॉम्बे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.