Emotional Video : आपल्यापैकी बरेच जण कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त शहरात आलेलो असतो. अशावेळी अनेकांसाठी नवीन शहरात राहायला जाणे कठीण असते. यावेळी तुम्ही तुमचे कुटुंब आणि मित्रांना मागे सोडतो. नवीन ठिकाणी जाणे रोमांचक असले तरी आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी भावूक करणारं असतं. अशाच प्रकारे नवे ठिकाणही सोडतानाही आपण तितकेच भावूक होतो. घरच्यांपासून दूर राहताना मदतनीस म्हणून आपल्या घरी कामासाठी येणाऱ्या मावशी किंवा ताई या एखाद्या देवापेक्षा कमी नसतात असा अनेकांचा अनुभव आहे. अनेकांचे त्यांच्यासोबत घरातील व्यक्तीसारखे नाते तयार होते. अशाच एका कामवाल्या ताईंचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर आणि कंटेंट क्रिएटर अनिश भगतसोबत (Anish Bhagat) असाच काहीसा प्रसंग घडलाय.
अनिश भगत हा मुंबईत आपल्या मित्रांसोबत राहत होता. अनिशला घरच्या कामात मदत करण्यासाठी रेश्मा नावाची एक गृहिणी होती. रेश्मा अनेक दिवसांपासून अनिशच्या घरी काम करत होती. दोघांमध्ये भावा-बहिणीसारखे नाते होते. अनेकांच्या अनिशच्या इन्स्टाग्राम व्हिडीओंमध्ये रेश्मा यांना पाहिले असेल. पण आता अनिश त्याच्या कामानिमित्त दुसऱ्या शहरात शिफ्ट झाला आहे. त्यामुळे अनिश आणि रेश्मा दोघांची साथ सुटली आहे. यामुळे कायमच सप्राईज देणाऱ्या अनिशला रेश्माने खास फेअरवेल (farewell lunch) दिलं आहे.
या भावनिक प्रसंगी रेश्माने अनिशला तिच्या घरी बोलावले आणि जेवू घातले. यावेळी अनिशला खास टोपी आणि श्रीफळ देण्यात आलाय. अनिशने त्याचा व्हिडिओ स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना अनिशने , 'मी किती भावूक आहे हे मीसुद्धा व्यक्त करू शकत नाही. रेश्मा दी माझी बेस्ट फ्रेंड आहे. मला दुसर्या शहरात जाण्याचे खूप वाईट वाटते कारण मला रोज रेश्माला पाहायची सवय आहे. ती नेहमीच माझी काळजी घेत असे. तिने मला त्यांच्या घरी बोलावण्याची पद्धत खूप गोड आहे, असे म्हटले आहे.
पाहा व्हिडीओ -
'मला दु:ख आहे की मी तिला रोज पाहू शकणार नाही. मात्र आमच्यासाठी हा शेवट नाही. ही खरोखरच एक नवीन सुरुवात आहे. रेश्मा दी सदैव आमच्या सोबत आहे आणि आमच्या सोबत राहील, असेही अनिशने म्हटले आहे. हा व्हिडीओ सात लाखांहून अधिक वेळा पाहिली गेला आहे तसेच 93,000 लाईक्स मिळाले आहेत.