मुंबई : मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. रुग्णांचे प्राण वाचवण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचेही त्यांनी .यावेळी सांगितले.
लॉकडाऊन करावा की नाही, त्या निर्णयावर मुख्यमंत्री पोहचत आहेत. रेल्वेचे 2800 खाटा तयार आहेत. वरळीमध्ये 200 ऑक्सिजन व्हेंटिलेटर, आयसीयु 2500 तयार आहेत. कांजुरमार्गलाही जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात येईल. असे महापौर पेडणेकर यांनी म्हटले आहे.
वॉर रुममद्ये नोंदणी करा, बेड कुठे कोणत्या रुग्णालयात हवा याबाबत चॉईस ठेऊ नका. काळ कठीण आहे. काल 50 जणांचा मृत्यू म्हणजेच ही त्सुनामी आहे. एप्रिलमध्येच संख्या वाढत असल्याने पुढचा काळ आणखी बिकट असणार आहे. आर्थिक परिस्थिती नसली तरी निर्बंधांची तयारी ठेवा असेही सूतोवाच महापौरांनी केले आहे.
मुंबईत आणखी 4 जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात येणार आहेत. सिडको, एमएमआरडीए, म्हाडा, बीएमसी एकत्रित प्रयत्नातून कोव्हिड सेंटर उभारणार आहे.
कांजूरमार्ग (एमएमआरडीए)
2000 खाटा , आयसीयु बेड 200
मालाड (रहेजा ग्राऊंड सिडको)
2000 खाटा, आयसीयु बेड 200
सोमय्या ग्राऊंड (म्हाडा)
1000 खाटा, आयसीयु बेड 200
महालक्ष्मी (बीएमसी)
300 खाटा, आयसीयु बेड 200
लवकरच या कोव्हिड सेंटरमध्ये आरोग्य सेवा सुरू होईल. सध्या रुग्ण उशीरा रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे दगावण्याच्या शक्यता वाढतात. रुग्णांच्या तत्काळ उपचारासाठी महापालिका प्रयत्नशिल आहे. असेही महापौर पेडणेकर यांनी सांगितले.