'अशा नेत्यांना राजकारणातून बाहेरचा रस्ता दाखवायला हवा...', जया बच्चन यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप; जया बच्चन यांच्या प्रतिक्रियेनंतर सर्वत्र खळबळ   

Updated: Nov 14, 2022, 12:18 PM IST
'अशा नेत्यांना राजकारणातून बाहेरचा रस्ता दाखवायला हवा...', जया बच्चन यांची प्रतिक्रिया title=

Jaya Bachchan on Jitendra Awhad Woman Molestation Case : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा आरोप (Woman Molestation Case) केल्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. हे प्रकरण त्यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मविआ महिला खासदार, आमदारांचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेतली आहे. 

मविआ महिला खासदार जया बच्चन यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा याठिकाणी निषेध केला. काही मंत्र्यामुळे राजकारण खराब होत असल्याचं वक्यव्य त्यांनी यावेळी केलं. शिवाय त्यांना राजकारणातून बाहेरचा रस्ता दाखवायला हवा असं देखील जया बच्चन म्हणाल्या. 

काय म्हणाल्या जया बच्चन?
'आम्ही राज्यपालांची भेट घेतली आहे. महिलांवर होणारा अपमान सहन करणार नाही. कोणत्याही सरकारमध्ये महिलांवर होणारे असभ्य वक्तव, महिलांचा अपमान करणाऱ्यांना आणि अश्लील गोष्टी बोलणाऱ्या व्यक्तींना बाहेरतचा रस्ता दाखवायला हवा. राजकारणात अशा लोकांची काहीही गरज नाही... असं एक उदाहरण आता आपण तयार करायलं हवं..

काय म्हणाले राज्यपाल?
राजकारणात महिलांचं स्थान वाढवण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळे असे वक्तव्य करणं बंद करायला हवंय. राज्यपाल यांच्या काही मर्यादा असतात, त्यांच्या पुढे ते जावू शकत नाहीत. राज्यपालांनी जर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असेल तर त्यांनी सांगायला हवं आम्हाला पत्र आलं आहे आणि या प्रकरणावर वक्तव्य करायला हवं... ज्यांनी चुकीचं काम केलं आहे त्यांना बेदखल करायला हवं. अशामुळे फक्त महिलांचं नाव खराब होत नसून राजकारणाचं नाव खराब होत आहे. असं देखील जया बच्चन म्हणाल्या.