मुंबईच्या 'या' पाच स्टेशनसाठी व्हॉट्सऍपवर मिळणार टॅक्सी सेवा

अशी करू शकता टॅक्सी बुक 

Updated: Jun 1, 2020, 04:16 PM IST
मुंबईच्या 'या' पाच स्टेशनसाठी व्हॉट्सऍपवर मिळणार टॅक्सी सेवा  title=

मुंबई : विशेष रेल्वे सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांच्या सोईकरता परिवहन आयुक्तांनी टॅक्सीसेवा देखील सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. घर ते रेल्वे स्थानक आणि रेल्वे स्थानक ते घर असा प्रवास करण्यासाठी प्रवाशांची गैरसोय होईल याचा विचार करून टॅक्सीसेवा सुरू करण्यात आली आहे. घरातून बाहेर पडून टॅक्सी सुरू करण्याऐवजी व्हॉट्सऍपवर टॅक्सी बुक करण्याची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. 

प्रवाशांकरता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, मुंबई सेंट्रल, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनल्स, वांद्रे टर्मिनल्स येथे टॅक्सी सेवा उपलब्ध राहणार आहे. टॅक्सी शोधण्यासाठी प्रवाशांची तारंबळ उडू नये म्हणून स्टेशनवर मुंबई टॅक्सी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

ज्या प्रवाशांना टॅक्सी बुक करायची आहे त्यांनी कॉल करून किंवा व्हॉट्सऍप करून टॅक्सी रजिस्टर करायची आहे. स्वतःच्या सुरक्षेकरता प्रवाशांनी घरातून निघण्यापूर्वीच टॅक्सी बुक करावी. जेणे करून सोशल डिस्टन्शिंगचा आणि विनाकारण तात्कळत राहण्याची वेळ येणार नाही. 

खासगी गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने ई-तिकिटची सुविधा केली आहे. मात्र पाच सीट असलेल्या गाडीत ३ जण आणि ७ सीट असलेल्या गाडीच ५ प्रवाशी प्रवास करू शकतात. यामध्ये चालकाचा देखील समावेश आहे. स्कूटर, बाईक आणि ऑटो रिक्षाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. 

सीएसएमटी, मुंबई सेंट्रल, दादर: चंदू नायर ९८२१६४०४९८

लोकमान्य टिळक टर्मिनस: फरीद ७९७७७७४८८४, शशी दुबे ९८३३०८०८००, तुपे ९०८२८८८३८०

वांद्रे टर्मिनस : देवाडिगा ९०२९८८५९३८, कोटीयन ७९७७९२७००९

मुंबई टॅक्सी संघटना प्रतिनिधी : शाम खानविलकर ८३६९५४५४५७, ८६५५५५१५६२