आता अभिनेत्री कंगनाची ड्रग्ज लिंकबाबत चौकशी होणार

अभिनेत्री कंगना रनौत ड्रग्ज घेत होती आणि तिने ड्रग्ज घेण्यासाठी आपल्यालाही बळजबरी

Updated: Sep 11, 2020, 02:11 PM IST
  आता अभिनेत्री कंगनाची ड्रग्ज लिंकबाबत चौकशी होणार

मुंबई : मुंबई पोलीस  अभिनेत्री कंगना रनौतची ड्रग्ज लिंकबाबत चौकशी करणार आहेत. महाराष्ट्र सरकारनं याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. कंगनाने कधी ड्रग्ज घेतलं होतं का, याची मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. 

अभिनेत्री कंगना रनौत ड्रग्ज घेत होती आणि तिने ड्रग्ज घेण्यासाठी आपल्यालाही बळजबरी केल्याचं, कंगना रणौतबरोबर रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या अभिनेता अध्ययन सुमन याने २०१६ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत म्हंटलं होतं. 

अध्ययन सुमन याच्या त्या विधानावरून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश दिलेत. 

काही दिवसापूर्वी कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाचं अनधिकृत बांधकाम, मुंबई महापालिकेने पाडलं होतं. यानंतर कंगनाने अतिशय तीव्र शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत प्रतिक्रिया दिली होती.