रणवीर सिंहने क्रिकेटच्या या लिजंटला केला खुलेआम KISS,सोशल मीडियावर फोटोची जोरदार चर्चा

'किस' करतानाचा हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

Updated: Dec 23, 2021, 05:05 PM IST
रणवीर सिंहने क्रिकेटच्या या लिजंटला केला खुलेआम KISS,सोशल मीडियावर फोटोची जोरदार चर्चा title=

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमने 25 जून 1983 साली क्रिकेट विश्वचषक जिंकत इतिहास रचला होता. भारतीय टीमच्या या ऐतिहास कामगिरीवर आधारित ‘83’ हा चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्यावेळच्या क्रिकेट टीमचे कर्णधार कपिल देव यांची भूमिका बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग साकारत आहे. 

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपटम २४ डिसेंबरला म्हणजेच उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याआधी सेलिब्रेटी आणि मीडियासाठी या चित्रपटाचं स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. १९८३ चा विश्वषचक विजेता कर्णधार कपिल देवही यावेळी आवर्जुन उपस्थित होते. यावेळी रणवीर सिंग याने कपिल देव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान रवणीर सिंग आणि कपिल देव एकमेकांना किस करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या फोटोवरुन रणवीस सिंग आणि कपिल देव यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं आहे.  कपिल देव हे भारताच्या महान कर्णधारांपैकी एक आहेत. भारताने 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. वेस्ट इंडिजचा पराभव करून भारताने विजेतेपद पटकावले.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल
रणवीर सिंग आणि कपिल देव स्टेजवर एकत्र दिसले. यादरम्यान दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोघे एकमेकांना किस करताना दिसत आहेत.   प्रसिद्ध फोटोग्राफर योगेन शाह यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो पोस्ट केला आहे. कबीर खान दिग्दर्शित '83' हा चित्रपट 1983 विश्वचषकावर आधारीत आहे. 

रणवीर सिंग आणि कपिल देव यांचा 'किस' करतानाच्या फोटोची  जोरदार चर्चा होत आहे. या फोटोत रणवीर सिंग पांढऱ्या कपड्यात दिसत असून त्याच्या डोळ्यांवर काळा चष्मा आहे. तर कपिल देव यांनी निळा कुर्ता परिधान केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

24 तारखेला प्रदर्शित होणार चित्रपट
'83' हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाच्या १९८३ विश्वचषक विजयावर आधारीत आहे. या चित्रपटात दीपिका आणि रणवीर व्यतिरिक्त, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, एमी विर्क, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतिन सरना, जीवा यांच्या भूमिका आहेत.  83 चं दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे.  ह 24 डिसेंबरला हा चित्रपट पडद्यावर झळकणार आहे.

विश्वचषकात भारताचा बोलबाला
80 च्या दशकात, वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा दबदबा होता. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाकडे नेहमीच विजेतेपदाचे दावेदार म्हणून पाहिलं जात होतं.  त्या काळी जगातील सर्वोत्कृष्ट आणि घात गोलंदाज विंडिजच्या संघात होते. याच जोरावर वेस्ट इंडिजने १९७५ आणि १९७९ असे सलग दोन वेळा विश्वचषकावर नाव कोरलं. १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेतही विंडिज विजेतेपदाची हॅटट्रीक करण्याच्या उद्देशाने उतरली होती.

पण कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सर्वांना चकीत केलं. त्यावेळच्या बलाढ्य संघांना धूळ चारत भारताने विश्व चषक पटकावला आणि इतिहास रचला. भारताच्या याविजयात कपिल देव यांचं योगदान महत्त्वाचं होतं.