कुर्ल्यात 'मेहताब' इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी

 सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याचा अंदाज

Updated: Jan 24, 2020, 11:12 PM IST
कुर्ल्यात 'मेहताब' इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी

मुंबई : मुंबईतल्या कुर्ला पश्चिम येथे भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मेहताब २ या इमारतीला ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचत आहेत. पण आगीच लोण वेगाने पसरत आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्यांना वाट करुन देण्यासाठी कुर्ल्याकडे जाणारी मार्गिका बंद करण्यात आली आहे. पोलीस, अग्निशमन दलाचे कसोशीचे प्रयत्न सुरु आहे. 

दोन ते तीन मजल्यांची इमारत असल्याची माहिती निवासी इमारत असून अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागाच्या बाजूची इमारत आहे. कुर्ला स्थानकाच्या जवळ ही इमारत असून हा दाटीवाटीचा परिसर आहे.