कोरोना काळात 'लिव्ह टू गिव्ह' संस्थेमार्फत गोरगरिबांना मदत

अन्न दान करून गोरगरिबांना मदत 

Updated: May 11, 2021, 11:43 AM IST
कोरोना काळात  'लिव्ह टू गिव्ह' संस्थेमार्फत गोरगरिबांना मदत

मुंबई : कोरोनाच्या या कठीण काळात गोरगरिबांपर्यंत अन्न आणि मदत पोहचवण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. गोरगरिबांना मदत करणारी 'लिव्ह टू गिव्ह' ही संस्था कोरोना काळातही तत्परतेने सामाजिक कार्य करत आहे. रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना रोज अन्न पोहचवण्याचं काम ही संस्था करतेच. तर सांताक्रूझ परिसरात एक असहाय व्यक्तीची सुटका या संस्थेने केली.

रघुनाथ ही बेवारस व्यक्ती सांताक्रूझच्या क्वीन्स व्ह्यू इमारतीजवळ जखमी अवस्थेत होती. रघुनाथ असं या व्यक्तीचं नाव असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती. याची माहिती मिळताच संस्थेचे संचालक मरझी पारेख तेथे आले आणि त्यांनी त्वरित या व्यक्तीला केईएम मध्ये ऍडमिट केलं. यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले आणि त्याला योग्य उपचारही मिळाले.

लिव्ह टू गिव्ह या जागतिक संस्थेला मुंबई पालिका तसंच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची साथ मिळाली आहे. या संस्थेतून गरिबांना अन्न, तसंच रुग्णांना प्लाझ्मा, ऑक्सिजन ची देखील मदत केली गेली आहे. या संस्थेला विविध स्तरातुन डोनेशन मिळत असून ही संस्था ग्राउंड लेव्हल वर जाऊन मदत पोहचवण्याचं काम करत आहे. लिव्ह टू गिव्ह संस्थेचे संस्थापक मरझी पारीख यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. 

लिव्ह टू गिव्ह ही संपूर्ण देशभरात काम करणारी संस्था आहे. मग कोरोना च नाही तर त्याआधीपासून या संस्थेतर्फे अनेकांना मदत पोहचली आहे. व्हाट्सएप ग्रुप मधून ही संस्था अनेकांशी जोडली गेली आहे. यामधून त्यांना डोनेशन मिळत आहेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदतही पोहचत आहे