Ganpat Gaikwad Shooting LIVE: महेश गायकवाडवर सहा तास शस्त्रक्रिया; प्रकृती गंभीर असल्याची श्रीकांत शिंदेंची माहिती

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : उल्हासनगर येथील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपाचे कल्याण पूर्वचे गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

Ganpat Gaikwad Shooting LIVE: महेश गायकवाडवर सहा तास शस्त्रक्रिया; प्रकृती गंभीर असल्याची श्रीकांत शिंदेंची माहिती

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : उल्हासनगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर भाजपचे आमदार गणेश गायकवाड यांनी गोळ्या झाडल्या. हा गोळीबार हिल लाईन पोलीस ठाण्यामधील एका वरिष्ठ पोलिसाच्या केबिनमध्ये घडला. आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड आणि त्यांचे समर्थक दीर्घकाळ चाललेल्या जमिनीच्या वादावर तक्रार दाखल करण्यासाठी जमले होते. त्यानंतर गणपत गायकवाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

3 Feb 2024, 09:04 वाजता

..तर बाप म्हणून जगण्यात अर्थ नाही'; फडणवीसांबद्दल बोलताना गोळीबार करणाऱ्या BJP आमदाराचं विधान

उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टीचे कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पार्टीचे राज्यातील सर्वात वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असताना त्याच पक्षाचा आमदार कायदा हातात घेतो, यासंदर्भात 'झी 24 तास'शी बोलताना आमदार गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी यावरही प्रतिक्रिया नोंदवली आहे. (सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

3 Feb 2024, 08:48 वाजता

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : इतक्या टोकाचा निर्णय का घेतला? अजित पवारांचा सवाल

"आमदाराचं झी 24 तासशी झालेलं बोलणं ते मी पाहिलं. मुळात कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कायदा हा शेवटी सर्वश्रेष्ठ असून तो सर्वांसाठी समान आहे. सामन्य व्यक्ती असेल किंवा उच्च पदावरील व्यक्ती असेल सर्वांना नियम आणि कायदे सारखेच आहेत. इतक्या टोकाचा निर्णय का त्यांनी घेतला? चॅनेलला फोनवरून दिलेली माहिती देखील कायद्याला धरून नव्हती," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

3 Feb 2024, 08:38 वाजता

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा?; विजय वडेट्टीवारांची टीका

"भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगर इथे पोलिस स्थानकात गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे. भाजपवाल्यांचे बॉस "सागर" बंगल्यावर आणि शिंदे गटाचे "बॉस" वर्षा बंगल्यावर बसून आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसवून हा माज नाचवू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे. गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात..कायदा आणि सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघालेला असा आपला महाराष्ट्र  कधी नव्हता!," अशी पोस्ट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

3 Feb 2024, 08:36 वाजता

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : मुख्यमंत्र्यांनी किती पैसे खाल्ले ते सांगावे - गणपत गायकवाड

"एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलं आहे. मी वरिष्ठांना बऱ्याचदा सांगितलं होतं की हे लोक वारंवार माझा अपमान करतात. माझा निधी वापरला जातो त्या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे स्वत:चे बोर्ड लावतात जबरदस्तीने. मी वेळोवेळी सांगितलं आहे. मी ज्या ज्या ठिकाणी राज्य शासनाचा निधी आणला त्या ठिकाणी श्रीकांत शिंदेंनी आपले बोर्ड लावले. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. एकनाथ शिंदेंनी त्या भ्रष्टाचारामध्ये किती पैसे खाल्ले हे त्यांनी सांगावे," असेही गणत गायकवाड म्हणाले.

3 Feb 2024, 08:35 वाजता

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : एकनाथ शिंदे असतील तर महाराष्ट्रभर गुन्हेगारच पैदा होतील - गणपत गायकवाड

"एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला आज एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार बनवलं आहे," असा गंभीर आरोप गणपत गायकवाड यांनी केला.

3 Feb 2024, 08:34 वाजता

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : आमदार गणपत गायकवाड यांच्यासह दोघांना अटक

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी भाजपचे कल्याण पूर्व चे आमदार गणपत गायकवाड यांच्या सह दोन जणांविरोधात जीवे मारण्याचा ,तसेच शस्त्र कायदा अंतर्गत रात्री उशिरा हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे , पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणे , संदीप सरवणकर या दोन जणांना अटक केली आहे. रात्री उशिरा यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली , सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी गणपत गायकवाड यांना शासकीय रुग्णालयात न नेता पोलीस ठाण्यातच त्यांची वैद्यकीय तपासणी केली. आमदार काय गायकवाड यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
कोणीही चिथावणी न देता गणपत गायकवाड यांनी शांत बसलेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्या असल्याचा पोलिसांनी सांगितलं. द्वारली गावात असलेल्या जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

3 Feb 2024, 08:31 वाजता

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : ...म्हणून मी गोळीबार केला - गणपत गायकवाड

"पोलीस  ठाण्यामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा जबरदस्ती कब्जा घेतला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील, तर महाराष्ट्रात गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार केलं आहे. माझा मनस्ताप झाला, म्हणून मी फायरिंग केली," अशी प्रतिक्रिया आमदार गणपत गायकवाड यांनी दिली.