Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या...लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

Mumbai Ganapati Visarjan Celebration Live Updates: किती वाजता होणार विसर्जन? जाणून घ्या मुंबई प्रशासनानं कशी केलीय तयारी...   

Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या...लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

Ganpati Visarjan 2024 in Mumbai Celebration Live Updates: 10 दिवसांचा पाहुणचार स्वीकारल्यानंतर लाडका बाप्पा आता सर्वांचा निरोप घेत पुढच्या प्रवासासाठी निघाला. उत्सवाच्या या माहोलानंतर आता सर्वत्र कल्ला असणारं आणि गजबजाटाचं वातावरण शमून घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर आता पुन्हा एकदा त्यांच्या दिनचर्येमध्ये व्यग्र होतील. मनात आस असेल ती म्हणजे बाप्पा पुढच्या वर्षी येणार तेव्हा त्यांचं स्वागत कसं करायची याबाबतची आणि इच्छा असेल ती बाप्पानं आपल्यावर वरदहस्त कायम ठेवावा याची... गणपती बाप्पा मोरया!!!

 

17 Sep 2024, 15:39 वाजता

Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: मुंबईतील चिंचपोकळी परिरात प्रचंड गर्दी 

चिंचपोकळी, लालबाग आणि परळ परिसरात तूफान गर्दी. लालबागचा राजा गणेश गल्ली परिसरातून पुढे मार्गस्थ, तर नरेपार्क, गणेशगल्ली आणि इतर मंडळांचे गणपती चिंचपोकळी पुलावरून पुढील मिरवणुकीसाठी मार्गस्थ. 

17 Sep 2024, 14:44 वाजता

Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates:  मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी

चिंचपोकळीतील श्रॉफ बिल्डींग येथे गणेशगल्लीचा गणपती अर्थात मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी 'ही शान कोणाची, मुंबईच्या राजाची...' असा एकच जयघोष झाल्याचं पाहायला मिळालं. 

17 Sep 2024, 14:17 वाजता

Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: गिरगाव चौपाटीवर मोठे गणपती येण्यास सुरुवात 

10 दिवसांच्या पाहुणचारानंतर विसर्जनासाठी निघालेल्या बाप्पांचं गिरगाव चौपाटीवर आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. घरगुती गणपतींसमवेत इथं सार्वजनिक गणेशमूर्तींचंही आगमन होण्यास सुरुवात. 

17 Sep 2024, 14:05 वाजता

Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: अनंत चतुर्दशीच्या धर्तीवर गिरगाव चौपाटीवर प्रशासन सज्ज 

अनंत चतुर्दशीचा उत्सव मुंबई महाराष्ट्रासह देशभरात साजरा केला जात आहे. मुंबईच्या गिरगांव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी लक्षावधी गणेशभक्त हजेरी लावतात. त्या अनुषंगाने सरकार, महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांच्या काळजीच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात आहे.

17 Sep 2024, 13:34 वाजता

Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: प्रचंड गर्दीतून वाट काढत लालबागचा राजा मार्गस्थ

प्रचंड गर्दीतून वाट काढत लालबागचा राजा विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाला आहे. सध्याच्या घडीला राजाची मिरवणूक लालबाग चौकातून युटर्न घेवून भारतमाता चौकाकडे जात आहे. इथून पुन्हा गणपतीची ही भव्य मिरवणूक निर्धारित मार्गावर मार्गस्थ होईल. सध्या लालबागच्या राजासमवेत कॉटनचा राजा आणि इतरही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती मार्गस्थ झाल्या आहे. 

lalbaugcha raja

17 Sep 2024, 12:37 वाजता

Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: विसर्जन मिरवणुकीसाठी लालबागमध्ये येताय? 

लालबाग आणि नजीकच्या परिसरामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड गर्दी झाली असून, या गर्दीमध्ये येण्याआधी येथील परिस्थितीचा आढावा घेऊन येण्याचं आवाहन करण्यात येत आहे. शिवाय गर्दीच्या समयी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही गणेशोत्सव मंडळं करत आहेत. 

17 Sep 2024, 12:04 वाजता

Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: पुष्पवृष्टीनं न्हाऊन निघाल्या गणेमूर्ती

तेजुकायाचा राजा गणेश मंडळाच्या श्रींच्या मूर्तीवर श्रॉफ बिल्डिंग येथे सुरेख पुष्पवृष्टी. दृश्य मन मोहणारी. 

 

17 Sep 2024, 11:29 वाजता

Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: लालबागमध्ये तोबा गर्दी....

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोबा गर्दी झाली असून, मंडळाचं मुख्य प्रवेशद्वार तोडून भाविकांनी गणपतीपुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. या भागामध्ये सध्या प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

17 Sep 2024, 11:28 वाजता

Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: श्रॉफ बिल्डींग पुष्पवृष्टीवर सर्वांच्या नजरा 

चिंचपोकळी इथं असणाऱ्या श्रॉफ बिल्डींग पुष्पवृष्टी मंडळाच्या माध्यमातून आता इथून जाणाऱ्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. इथं प्रथम परळच्या महाराजावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यानंतर या मार्गावरून अनेक गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पुढे जातील. 

17 Sep 2024, 11:27 वाजता

Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: लालबागच्या रस्त्यांवर गुलालाची उधळण 

अनेक सार्वजनिक मंडळांचे गणपती विसर्जनास निघाले असल्यामुळं लालबाग परिसरात गणपती बाप्पा मोरया चाच जयघोष. रस्त्यांवर गुलालाची उधळण आणि ढोल ताशांचा गजर.