Ganpati Visarjan 2024 in Mumbai Celebration Live Updates: 10 दिवसांचा पाहुणचार स्वीकारल्यानंतर लाडका बाप्पा आता सर्वांचा निरोप घेत पुढच्या प्रवासासाठी निघाला. उत्सवाच्या या माहोलानंतर आता सर्वत्र कल्ला असणारं आणि गजबजाटाचं वातावरण शमून घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर आता पुन्हा एकदा त्यांच्या दिनचर्येमध्ये व्यग्र होतील. मनात आस असेल ती म्हणजे बाप्पा पुढच्या वर्षी येणार तेव्हा त्यांचं स्वागत कसं करायची याबाबतची आणि इच्छा असेल ती बाप्पानं आपल्यावर वरदहस्त कायम ठेवावा याची... गणपती बाप्पा मोरया!!!
17 Sep 2024, 09:31 वाजता
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: मुंबईचा राजा, राजा तेजुकायाचा विसर्जनासाठी मार्गस्थ
लालबागमधील मानाचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ. मुंबईच्या राजामागोमाग तेजुकायाचा राजाही विसर्जनास निघाला. ढोलताशांच्या गजरात गणपती विसर्जनासाठी असंख्य भाविकांची गर्दी...
17 Sep 2024, 09:07 वाजता
लालबागचा राजाच्या मिरवणुकीसाठी 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त
'लालबागचा राजा'च्या विसर्जन मिरवणुकीला होणारी गर्दी पाहता या मिरवणुकीसाठी 5 हजार पोलीस जागोजागी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये काही संवेदनशील भागांचाही समावेश आहे.
17 Sep 2024, 07:58 वाजता
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या....
सुखकर्ता दु:खहर्ता... अशा आरतीच्या नादात गणेशगल्लीच्या गणरायाची आरती संपन्न झाली असून, शेकडो गणेशभक्तांनी एका सुरात आरती गात गणरायाला आळवलं. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणरायाला निरोप देण्यासाठी हे भक्त सज्ज झाले आणि श्रींच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली.
17 Sep 2024, 07:45 वाजता
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: वाहतुकीतील बदल
- कोस्टल रोड (Coastal Road): मुंबईकरांचा प्रवास सुकर होण्यासाठी कोस्टल रोड 18 सप्टेंबरपर्यंत सुरूच राहणार आहे.
- मरीन ड्राइव (Marine Drive): एन एस रोडच्या उत्तरेकडील वाहतूक गरज पडल्यास इस्लाम जिमखान्यावरून कोस्टल रोडमार्गे वळवण्यात येईल.
- ईस्टर्न फ्रीवे (Eastern Freeway): पी डी’मेलो रोड, CSMT जंक्शन, प्रिंसेस स्ट्रीट या मार्गांवर वाहतुकीचे कोणतेही निर्बंध नाहीत.
- दक्षिण मुंबईमध्ये नाथालाल पारेख मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे आणि रामभाऊ साळगावकर मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील.
17 Sep 2024, 07:44 वाजता
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: शहरातील विविध भागांतून गणेशभक्तांची लालबागमध्ये गर्दी
मुंबई आणि उपनगरांतून अनेक गणेशभक्तांनी लालबाग परळची वाट धरत या भागांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. पहाटेपासूनच इथं ढोलताशा पथकं, ब्रास बँड पथकं आणि मोठ्या संख्येनं गणेश भक्त लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी दाखल झाले आहेत.
17 Sep 2024, 06:55 वाजता
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: किती वाजता सुरू होणार विसर्जन मिरवणुका?
मुंबईतील मानाच्या अशा गणपतींच्या विसर्जन मिरवणुका साधारण 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास सुरू होणार आहेत. तिथं गिरगावममधील गणपतींच्या मिरवणुकांची सुरुवात मात्र काशीही उशिरानं होणार आहे.
मुंबईचा राजा अशी ओळख असणाऱ्या गणेशगल्लीच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक सकाळी 8 वाजता सुरू होणार असून, ही मिरवणूक डॉ. एस एस राव मार्ग, जीजीभाई लेन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चिंचपोकळी पुलावरून थेट बकरी अड्डा इथून एस ब्रिजला उजवं वळण घेऊन संत गाडगे महाराज चौकातून निघेल. तिथून पुढं नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल, डी बी मार्ग, लॅमिंटन रोड मार्गे गिरगाव चौपाटी इथं दाखल होईल. इथं श्रींच्या मूर्तीचं विसर्जन होणार आहे.