Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या धर्तीवर सध्या मुंबईसह उर्वरित मतदारसंघांमध्ये प्रचाराला वेग आला असून, बड्या नेत्यांनीही प्रचाराच्या या अखेरच्या टप्प्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. राज्यात शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची सभा, तर नाशिक आणि डोंबिवलीत शिंदेंचं शक्तिप्रदर्शन.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये त्यांनी विरोधकांवर केलेली टीका पाहता आता या टप्प्यासाठीचं राजकारण पुन्हा तापताना दिसत आहे. यामध्ये कोणकोणत्या नेत्यांची भूमिका लक्ष वेधणारी आणि विरोधी पक्षांना ललकारणारी आहे याच्या सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
16 May 2024, 14:01 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : शरद पवारांच्या सभेत व्यासपीठावरील बॅनर कोसळला
धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ आयोजित सटाणा येथील सभेत शरद पवारांचे भाषण सुरू असताना स्टेज मागील बॅनर वादळामुळे कोसळला त्यामुळे शरद पवारांना भाषण आटोपते घ्यावे लागले.
16 May 2024, 13:35 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : शिवसेनेचे दोन्ही गट आमने- सामने
नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅली समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी मशालीचे चिन्ह दाखवून केली घोषणाबाजी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शंभर खोके एकदम ओके अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्याचं पाहायला मिळालं.
16 May 2024, 13:05 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : एकनाथ शिंदे हेलिपॅडवर पोहोचताच बॅगांची तपासणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर नाशिक हेलिपॅडवर पोहोचताच पोलिसांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली.
16 May 2024, 12:14 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हं कुणाचं ?
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हं कुणाचं यावरील सुनावणी आता 15 जुलैला होणारेय. सुप्रीम कोर्टाच्या वेळापत्रकातून ही संभाव्य तारीख जाहीर करण्यात आलीय. शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं होतं. याला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. यावर 15 जुलैला सुनावणी होणारेय.
16 May 2024, 12:10 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : मुंबईत मद्यविक्री बंद
मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील मतदानाचा शेवटचा टप्पा 20 मे रोजी पार पडणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी तीन दिवस दारूची दुकाने आणि बार बंद राहणार आहेत. मुंबई शहरात 18 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता दारूची दुकाने आणि बार बंद होतील. 19 मे रोजी दिवसभर बंद असणार आणि 20 मे संध्याकाळी 5 वाजता ही उघडणार आहेत. प्रशासनाने खबरदारी म्हणून हा आदेश काढला आहे.
16 May 2024, 11:35 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : अजित पवार आहेत तरी कुठे?
लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपल्यानंतर अजित पवार प्रचारात दिसले नाहीत. नरेंद्र मोदींच्या नाशिकच्या सभेतही अजित पवार गैरहजर होते. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पक्षाचे 4 आमदार असूनही फक्त छगन भुजबळांनीच मोदींच्या सभेला हजेरी लावली होती. मुंबईतील मोदींच्या रोडशो मध्येही अजित पवार कुठेच दिसले नाहीत. त्यामुळं आता ते नेमके आहेत तरी कुठे हाच प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे.
16 May 2024, 09:42 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : 'मोदींचा आत्मविश्वास गेला आहे'
मोदींचा आत्मविश्वास गेला आहे. मोदी सीएम असताना गुजरातचे प्रश्न माझ्याकडे घेऊन यायचे. शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी मोदी मला गुजरातला घेऊन जायचे. गुजरातचे प्रश्न माझ्याकडे घेऊन यायचे. मोदींना मी इस्रायलला घेवून गेलो होतो. आता राजकारण करण्यासाठी माझ्यावर टीका करत आहेत, अशा शब्दात शरद पवार यांनी टीकेचा सूर आळवला. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
16 May 2024, 09:17 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : शरद पवारांचा घणाघात
जाती-धर्मात अंतर वाढवणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत, असा घाणाघात शरद पवारांनी मोदींवर केलाय. देश एकसंघ ठेवण्याची पहिली जबाबदारी ही पंतप्रधानांची असते, असा चिमटाही त्यांनी दिंडोरीच्या सभेत काढला.
16 May 2024, 09:16 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : आयुष्य बदलणारा माई का लाल अजून जन्माला आला नाही
सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी विश्वजित कदमांना अप्रत्यक्षरीच्या इशारा दिलाय. माझं राजकीय आयुष्य बदलणारा माई का लाल अजून जन्माला आला नाही, अशा शब्दात संजयकाकांनी कदमांवर नाव न घेता घणाघात केलाय.
16 May 2024, 09:14 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरे मुंबईत चार सभा घेणार
उद्धव ठाकरेंचा मुंबईत लोकसभा निवडणूक प्रचारांचा धुरळा उडणार आहे. उद्धव ठाकरे एकाच दिवशी मुंबईत चार सभा घेणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 18 मे रोजी उद्धव ठाकरे मुंबईत चार सभा घेणार आहेत.