Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या धर्तीवर सध्या मुंबईसह उर्वरित मतदारसंघांमध्ये प्रचाराला वेग आला असून, बड्या नेत्यांनीही प्रचाराच्या या अखेरच्या टप्प्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. राज्यात शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची सभा, तर नाशिक आणि डोंबिवलीत शिंदेंचं शक्तिप्रदर्शन.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये त्यांनी विरोधकांवर केलेली टीका पाहता आता या टप्प्यासाठीचं राजकारण पुन्हा तापताना दिसत आहे. यामध्ये कोणकोणत्या नेत्यांची भूमिका लक्ष वेधणारी आणि विरोधी पक्षांना ललकारणारी आहे याच्या सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
16 May 2024, 09:13 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : मंगलप्रभात लोढा आज वसईत
दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंचा जोरदार प्रचार सुरु आहे. आज त्यांच्या मतदारसंघात ते चार सभा घेणार आहे. मंगलप्रभात लोढा आज वसईत प्रचारासाठी जाणार आहेत, भाजप उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी त्यांची वसईत सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज तीन जाहीर सभा होणार आहे. दुपारी 2.30 वाजता पहिली जाहीर सभा ही मनमाडमध्ये होणार आहे. त्यांनतर संध्याकाळी कुर्ला नेहरुनगर आणि रात्री मुलूंडमध्ये मराठा मंडळाजवळ त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय.
16 May 2024, 08:12 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांचा रोड शो
श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी डोंबिवलीत येत आहेत. डोंबिवलीच्या नांदीवली येथील स्वामी समर्थ चौकातून सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रचार रॅलीला (रोड शो) सुरुवात होईल. आजदे गावात रॅलीचा समारोप होईल.
16 May 2024, 07:13 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला
महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. रात्री 8 वाजता ठाण्यात उद्धव ठाकरेंची गडकरी रंगायतनमध्ये सभा होईल. तर नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रॅली असणार आहे. रोड शो करत मुख्यमंत्री शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
16 May 2024, 07:05 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : ठाकरे पक्ष आणि शरद पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?
लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे पक्ष आणि शरद पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये केलंय. शिवसेना ठाकरे पक्ष जेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होईल, तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येईल. कारण बाळासाहेबांना तेव्हा खुप दु:ख होईल, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला. तर शिवसेनेला नकली म्हणणाऱ्या पावट्यांना मोड फुटलेत असा पलटवार उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलाय.