पावसामुळे अनेक लोकल ट्रेन रद्द

अनेक लोकल सेवा रद्द 

मुंबई : रात्रीपासून पावसाने जोर धरला होता. सकाळपासून मुंबईसह अनेक उपनगरात पावसाची संतत धार कोसळत होती. याचा फटका लोकल वाहतूकवीर बसला आहे.  पावसामुळे मुंबईतील लोकल ट्रेन रद्द झाल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. आतापर्यंत अनेक लोकल ट्रेन रद्द केल्या असून प्रवाशांची गैरसोय होत आहे. 

पश्चिम रेल्वेवरील वाहतूक धिमी सुरू असून 35 ते 40 मिनिटे लोकल ट्रेन उशिराने आहे. सकाळपासून मुंबईत उपनगरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक कोलमडली आहे. प्रवाशांना कोणतीही सूचना दिली गेली नसल्यामुळे प्रवाशांना अनेक प्रश्न पडले आहेत.