कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. मुंबईच्या लोकल मधून आता सर्व महिलांना प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने तसे परीपत्रकच जाहीर केलं आहे. उद्या पासून म्हणजे शनिवारपासून होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवापासुन महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देऊन राज्य सरकारने महिलांना गोड बातमी दिली आहे.
कोविड १९ चा संसर्ग कमी झालेला नाहीये, त्यामुळे लोकलमध्ये गर्दी होऊ नये या दृष्टीने महिलांना लोकल प्रवास सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत तर संध्याकाळी ७ नंतर शेवटची लोकल असे पर्यंत प्रवास करण्याची परवानगी महिलांना राज्य सरकारने दिली आहे.
It's requested that local trains services be made available to all women from 11 am to 3 pm and again from 7 pm till the end of local services for the day, from 17th Oct, in Mumbai & Mumbai Metropolitan Region (MMR): Secretary, Disaster Mgmt, Relief & Rehabilitation, Maharashtra pic.twitter.com/szESCj6a2N
— ANI (@ANI) October 16, 2020
महिलांकरिता लोकलने प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. १७ ऑक्टोबरपासून सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवास करत येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत तर संध्याकाळी ७ नंतर शेवटची लोकल असेपर्यंत सर्व महिला प्रवास करू शकणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे मुंबई आणि MMR मधील महिलांना प्रवेश करता येणार आहे. तसेच यासाठी QR code गरज लागणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.